Saptashrungi Devi Temple : आदिमाया सप्तशृंगी मंदिरात 8 किलोची चांदीची कृष्णमूर्ती अर्पण

Saptashrungi Devi Temple : श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरात ८ किलो वजन असलेली चांदीची कृष्णमूर्ती तसेच, श्री भगवतीची प्रतिमा असलेले २५०० नग चांदीचे सिक्के (अंदाजित मूल्य रु. ११ लाख ५४ हजार) अर्पण करून अनोखे दातृत्व दर्शविले आहे.
Presenting 2500 silver stamps bearing the image of Shri Bhagwati, an 8 kg Krishna idol
Presenting 2500 silver stamps bearing the image of Shri Bhagwati, an 8 kg Krishna idol, donated by devotee Deepak Shroff and Kaiser Shroff family from London to Sri Saptashringi Devi Temple.esakal
Updated on

Saptashrungi Devi Temple : आद्य स्वयंभू शक्तिपीठ, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर लंडन येथील भाविक दीपक श्रॉफ व कैसर श्रॉफ परिवाराने श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरात ८ किलो वजन असलेली चांदीची कृष्णमूर्ती तसेच, श्री भगवतीची प्रतिमा असलेले २५०० नग चांदीचे सिक्के (अंदाजित मूल्य रु. ११ लाख ५४ हजार) अर्पण करून अनोखे दातृत्व दर्शविले आहे. (nashik 8 Kg Silver Krishna Murthy offered at Adimaya Saptashrungi Devi Temple marathi news)

श्री भगवतीचे भक्त असलेले श्रॉफ कुटुंबीय हे श्री भगवती दर्शनासाठी आले असता विश्‍वस्त भूषणराज तळेकर व विश्‍वस्त ॲड. मनज्योत पाटील यांनी त्यांना विश्‍वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवासुविधांची प्राथमिक माहिती दिली. त्यांनी श्री भगवतीच्या सेवेत काहीतरी योगदान देण्याबाबत ईच्छा व्यक्त केली असता आवश्यक तो समन्वय करण्यात आला.  (latest marathi news)

Presenting 2500 silver stamps bearing the image of Shri Bhagwati, an 8 kg Krishna idol
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचा महापूर; अष्टमीनिमित्त होम, पालखी मिरवणूक

गुरूवारी (ता. ४) सहकुटुंब श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर येत चांदीची कृष्णमूर्ती ८ किलो वजनाची, श्री भगवतीची प्रतिमा असलेले २५०० नग चांदीचे सिक्के श्री भगवतीचरणी अर्पण केले. विश्‍वस्त संस्थेच्या वतीने त्यांचा करण्यात आला. यावेळी विश्‍वस्त भूषणराज तळेकर, ॲड. मनज्योत पाटील, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, पुरोहित धनंजय दीक्षित यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Presenting 2500 silver stamps bearing the image of Shri Bhagwati, an 8 kg Krishna idol
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? लवकरच निर्णय होण्याचे सूतोवाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.