Nursing CET Exam : बी. एस्सी. नर्सिंगच्‍या सीईटीला 85 टक्‍के विद्यार्थ्यांची उपस्‍थिती

Nashik News : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून बी. एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो आहे.
Nursing CET Exam
Nursing CET Examsakal
Updated on

Nashik News : इयत्ता बारावीनंतर बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी मंगळवारी (ता. २८) राज्‍यस्‍तरावर सीईटी परीक्षा घेण्यात आली. दिवसभरात तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ८५ टक्‍के उपस्‍थिती राहिली. गेल्‍या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून बी. एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो आहे. (85 percent attendance of CET Nursing students)

त्‍यापूर्वी या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नीट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जायचे. दरम्‍यान, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी मंगळवारी राज्‍यस्‍तरावर सीईटी परीक्षा घेण्यात आली. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा असल्‍याने एकूण तीन सत्रांचे आयोजन राज्‍यातील १२५ परीक्षा केंद्रांवर केले होते.

त्‍यानुसार सकाळी नऊ ते साडेदहा, दुपारी साडेबारा ते दोन आणि दुपारी चार ते साडेपाच या वेळेत परीक्षा पार पडली. (latest marathi news)

Nursing CET Exam
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्राचा तपशील प्रवेशपत्रावर उपलब्‍ध करून दिला होता. त्‍यानुसार विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत केंद्र गाठत परीक्षा दिली.

दरम्‍यान, नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी राज्‍यस्‍तरावर ५८ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हजार १८५ विद्यार्थ्यांनी मंगळवारी सीईटी परीक्षा दिली. राज्‍यस्‍तरावर उपस्‍थितीचे प्रमाण ८५.५९ टक्‍के राहिले. नाशिकमध्येही विविध केंद्रांवर सुरळीतरीत्‍या परीक्षा पार पडली. आता परीक्षेच्‍या निकालाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहणार आहे.

Nursing CET Exam
Nashik Onion News : दुष्काळग्रस्त तालुक्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.