नाशिक : यंदा जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या तब्बल २० टक्के लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा झाला. अद्यापही जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईवर आतापर्यंत ९० कोटी खर्च झाला असून, या निधीची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे मागणी केली आहे.
यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ८५ कोटी खर्च झाला आहे. येवला, नांदगाव, सिन्नर तालुक्यांत टंचाईचा सर्वाधिक खर्च झाला आहे. मागणी करूनही राज्य शासनाकडून टंचाई खर्चाचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. (90 crore spent on scarcity in district not available)