Nashik Girna Dam : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने धरणाचा जलसाठ्यात ९२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या व खान्देशसाठी वरदान गिरणा धरण यंदा शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. गिरणा धरणात ३५ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग येत आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव सह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मिटला तर खान्देश शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने समाधान आहे. (92 percentage dam filled Malegaon Nandgaon Chalisgaon water problem will be solved )