Nashik Milk Producer : विभागात 3 लाख दूध उत्पादकांना 93 कोटी; प्रतिलिटर 7 रुपये अनुदान

Milk Producer : सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या नाशिक विभागातील दोन लाख ९७ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना ९३ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
milk grant
milk grantesakal
Updated on

नाशिक : सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या नाशिक विभागातील दोन लाख ९७ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना ९३ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. दुग्धव्यवसाय विकास विभागातर्फे अनुदान वितरणाची प्रक्रिया जलद गतीने राबविली जात आहे. विभागात शेतकऱ्यांकडे विविध प्रकारच्या दहा लाख ८३ हजार नोंदणीकृत गायी आहेत. गायीचे दूध विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय विकास विभागाने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान घोषित केले. (93 crore subsidy of Rs 7 per liter to 3 lakh milk producers in department )

शासनाने ऑक्टोबरपासून या अनुदानात दोन रुपयांची वाढ करून सात रुपये इतके केले आहे. त्यासाठी दूध उत्पादक शेतकरी ज्या संघाला किंवा प्रकल्पाकडे दूध विक्री करतात, त्या आधारे राज्य शासनाकडून अनुदानाचे वाटप केले जाते. राज्यातील दोन लाख ५५ हजार ९३२ शेतकऱ्यांना आतापर्यंत ८३ कोटी ९३ लाखांचे अनुदान वितरित झाले. यात नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील दूध उत्पादकांचा समावेश आहे. विभागात दोन लाख ९७ हजार ५५० दूध उत्पादकांची नोंदणी झाली; तर त्यांच्याकडे १० लाख ८३ हजार ६७५ विविध प्रकारच्या गायी आहेत.

त्यांचे टॅगिंग करून नोंदणी करण्यात आली. दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडत लाभार्थ्यांना अनुदान वाटप सुरू केले आहे. महिन्यात तीन टप्पे म्हणजेच दहा दिवसांचे अनुदान लाभार्थ्याला दिले जाते. यात जिल्हा स्तर, प्रादेशिक स्तर, आयुक्त स्तरावरील अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील दूध उत्पादकांसाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाने एक हजार ५५५ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

दूध भुकटी योजना बंद

दूध भुकटी निर्यातीस प्रतिकिलो ३० रुपये अनुदान व दूध भुकटी रूपांतरणास प्रतिलिटर दीड रुपया अनुदान ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लागू होते. यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (latest marathi news)

milk grant
Milk Producer : राज्यातील दूध उत्पादकांना 540 कोटींची आवश्‍यकता! दुग्धविकास विभागाची तरतूद

विभागाची स्थिती

जिल्हा दूध उत्पादक गायींची नोंदणी अनुदान (कोटी रु.)

अहमदनगर २,३०,४१३ ८,६९,२६४ ८१ कोटी ८२ लाख

नाशिक ४३,७४५ १,४५,०२२ ८ कोटी ७१ लाख

जळगाव २३,०८४ ६८,४९९ ३ कोटी १९ लाख

धुळे, नंदुरबार ३०८ ८९० १४ लाख

एकूण २,९७,५५० १०,८३,६७५ ९३ कोटी ६६ लाख

''दुधाचे तीन दसवड्यांचे अनुदान थेट खात्यावर जमा झाले. शासनाने ही योजना बारमाही सुरू ठेवली पाहिजे. त्यामुळे दूध उत्पादकांना हक्काचे उत्पन्न मिळेल आणि देशी गायींचे प्रमाणही वाढेल.''- भाऊसाहेब काळोखे, स्वस्तिक दूध संकलन, पाथरे (ता. सिन्नर)

''शासनाने २८ रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी व सात रुपये अनुदान दिल्याने त्याचा थेट फायदा आम्हाला झाला. माझ्याकडे नऊ गायी आहेत. दररोज ८० लिटर दूध निघते. ७५० ते ८०० लिटर दुधाचे अनुदान मला मिळाल्याने या योजनेचा थेट लाभ मिळाला.''- निखिल वल्टे, प्रेरणा दूध संकलन केंद्र, चांदोरी (ता. निफाड)

milk grant
Milk Producers : दूध उत्पादकांच्या खात्यावर 37 कोटी 20 लाख; दीड लाख जणांना अनुदानवाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.