Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 93.48 टक्के मतदान

Nashik News : शिक्षक मतदारांना पैसे व ‘गिफ्ट’ वाटपामुळे राज्यभर चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) सरासरी ९३.४८ टक्के मतदान झाले.
Teachers Constituency Election 2024
Teachers Constituency Election 2024Sakal

Nashik News : शिक्षक मतदारांना पैसे व ‘गिफ्ट’ वाटपामुळे राज्यभर चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) सरासरी ९३.४८ टक्के मतदान झाले. नंदुरबार जिल्ह्यात (९६.१२ टक्के) सर्वाधिक, तर नाशिक जिल्ह्यात (९१.६३) सर्वांत कमी मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील २३ हजार १८४ मतदारांनी आपला हक्क बजावला. (93 percent polling for Nashik Teachers Constituency)

मतदारसंघातील २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असून, सोमवारी (ता. १) नाशिकमध्ये मतमोजणी होणार आहे. दरम्यान, शहरातील बी. डी. भालेकर हायस्कूलच्या केंद्राजवळ पैसे वाटप करणाऱ्या एका व्यक्तीला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. शिक्षक मतदारसंघातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात बुधवारी मतदान घेण्यात आले.

पाचही जिल्ह्यांत एकूण ६९ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झालेली असल्याने यंदा निवडणुकीत चुरस रंगल्याचे दिसून आले. सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक जिल्ह्यातून महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. महेंद्र भावसार हे तीन तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरले होते. अहमदनगरमधील अपक्ष विवेक कोल्हे व भाऊसाहेब कचरे यांच्यात लढत रंगलेली दिसून आली.

भरदुपारी बी. डी. भालेकर शाळेतील मतदान केंद्राबाहेर नाशिक जिल्ह्यातील एका उमेदवाराच्या नावाने मतदारांना पैसे वाटणाऱ्या विलास नरवडे या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिस त्याला तत्काळ पोलिस ठाण्यात घेऊन गेले आणि पंचनामा नोंदविला. या घटनेव्यतिरिक्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

मतदानासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत ९० मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली. संपूर्ण मतदारसंघात २२ हजार ८६५ महिला मतदारांपैकी २१ हजार १२४ महिलांनी (९२ टक्के), तर ४६ हजार ५०३ पुरुषांपैकी ४३ हजार ७२२ मतदारांनी (९४ टक्के) आपला हक्क बजावल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील २५ हजार ३०२ मतदारांसाठी २९ ठिकाणी मतदान केंद्रे होती. (latest marathi news)

Teachers Constituency Election 2024
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदार आज बजावणार हक्क; जिल्ह्यात 25 हजार 302 मतदारांसाठी 29 मतदान केंद्र

नाशिक शहरात दहा मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. एका मतदान केंद्राशी एक हजार २०० मतदार जोडल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. याविषयी उमेदवार व मतदारांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली. मतदान केंद्रात पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी खुर्च्या किंवा बाकही नसल्याने तासनतास रांगेत उभे राहावे लागले. मतदानासाठी वेळ लागत असल्याचे कानावर पडताच काही मतदार घराबाहेरच पडले नाहीत.

त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरल्याचे बोलले जाते. महायुतीसह महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांनी नाशिक शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली. सायंकाळी सहाला बी. डी. भालेकर मतदान केंद्रात पोहोचलेल्या एका महिला मतदाराला वेळ संपली म्हणून कर्मचाऱ्यांनी परत पाठविले. त्याविषयी ॲड. संदीप गुळवे यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. परंतु, वेळेअभावी या मतदाराला आपला हक्क बजावता आला नाही.

ॲड. ठाकरे-श्रीमती पवार आमने-सामने

मखमलाबाद येथील मतदान केंद्रात सायंकाळी मतदान संपायच्या वेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे विद्यमान सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे दाखल झाले. त्याच दरम्यान माजी सरचिटणीस नीलिमा पवार याही तिथे उपस्थित होत्या. ॲड. ठाकरे हे केंद्राच्या आत जाताना श्रीमती पवार यांनी आक्षेप घेतला. तुम्ही मध्ये जाणार असाल तर मीही आत येईन, असे म्हणत त्यांनीही मतदान कक्षात जाण्याची तयारी केली. वेळीच मतदान अधिकारी आणि पोलिसांनी मध्यस्थी केली.

शिक्षकांनी वेळ पाळायला हवी

आदिवासी विकास भवनशेजारील रमाबाई आंबेडकर विद्यालयात मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिटे अगोदर शिक्षक मतदार तिथे पोहोचले. मात्र, वेळ संपल्याने बाहेरचे गेट बंद करण्यात आल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.

Teachers Constituency Election 2024
Nashik Teacher Constituency: शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत 69 हजार मतदार बजावणार हक्क

यात राजकीय पदाधिकाऱ्यांनीही घोषणाबाजी केल्याने अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच धाव घेत त्यांना आवरले. मतदानाची वेळ सहापर्यंत असताना तोपर्यंत शिक्षक का आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षकांनी तरी वेळ पाळायला हवी, अशी चर्चा मतदान केंद्रात रंगली होती.

सोमवारी निकाल

शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी १ जुलैला नाशिक शहरातील अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात होणार आहे. झालेल्या मतदानापैकी वैध ठरलेल्या मतांना दोनने भाग देऊन उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला जातो. पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळविणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास शेवटच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपैकी दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. तरीही कोटा पूर्ण होत नसेल तर शेवटून दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराची मते मोजली जातात. अशा पद्धतीने कोटा पूर्ण होईपर्यंत पुढील प्रत्येक उमेदवाराची मते मोजली जातात. शेवटच्या फेरीपर्यंत कोटा अपूर्ण राहिल्यास सर्वाधिक मते असणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

Teachers Constituency Election 2024
Nashik Teacher Constituency Election : बोगस मतदार सिद्ध झाल्यास मुख्याध्यापकावरच कारवाई

जिल्हानिहाय झालेले मतदान

नंदुरबार : ९६.१२ टक्के

धुळे : ९३.७७ टक्के

जळगाव : ९५.२६ टक्के

नाशिक : ९१.६३ टक्के

अहमदनगर : ९३.८८ टक्के

मतदानाची वैशिष्ट्ये

-पुरुषांपेक्षा महिला मतदानाची टक्केवारी अधिक

-मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा

-महिला मतदारांचा संयम सुटला; थेट उमेदवारासमोरच मांडली व्यथा

-आमदार किशोर दराडे यांच्या नावाने पैसे वाटत असलेल्या व्यक्तीला अटक

-भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

-मतदारांकडून मोबाईलचा सर्रासपणे वापर

-बी. डी. भालेकर मतदान केंद्राला निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांची भेट

-नाशिक जिल्ह्यात एकूण २५ हजार ३०२ मतदारांपैकी २३ हजार १८४ इतके मतदान

-अहमदनगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ३९२ मतदारांपैकी १६ हजार ३२७ मतदान

-धुळे जिल्ह्यात एकूण ८ हजार १५९ मतदारांपैकी ७ हजार ६५१ मतदान

-जळगाव जिल्ह्यात एकूण १३ हजार १२२ मतदारांपैकी १२ हजार ५०० मतदान

-नंदुरबार जिल्ह्यात एकूण ५ हजार ३९३ मतदारांपैकी ५ हजार १८४ मतदान

Teachers Constituency Election 2024
Nashik Teacher Constituency Election : अजित पवार यांचा एक पक्ष अन चार तऱ्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com