Nashik News : शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत जिल्ह्यात डेंगीसदृश ७४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ९१ रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. मेमधील तीन आठवड्यांत तब्बल आठ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे डेंगी रुग्णांची संख्या ९९ वर पोचली आहे. या वर्षी अद्याप एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. (99 patients infected with dengue in Nashik district)
दरम्यान, वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नाशिक जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. यातच उष्णतेची लाट आलेली होती. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी साठवून ठेवले जात आहे.
उष्णता वाढल्याने घराघरांत कूलर, एसीचा वापर वाढल्याने डेंगीच्या रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात अनेक घरांतील कूलरमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या आहेत. साचलेल्या पाण्यातही अळ्या सापडत आहेत. त्यामुळे मेमध्ये आठ डेंगीचे रुग्ण सापडले आहेत. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ९१ रुग्ण सापडले होते. त्यामुळे डेंगीच्या एकूण रुग्णांची संख्या ९९ झाली आहे.
रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दर आठवड्याला याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंगीसदृश रुग्णांची तपासणी करण्याबाबत सूचना केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. (latest marathi news)
यामुळे होते डेंगी
डेंगीचा प्रादुर्भाव ‘एडिस एजिप्ती’ या प्रजातीच्या डासांमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती चार ते पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या पाण्यात होते. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात कूलर आणि एसीचा वापरही वाढला आहे. कूलर आणि एसीमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊन या ठिकाणी डेंगीच्या अळ्यांचे रूपांतर डासांमध्ये होत आहे.
दुष्काळामुळे ग्रामीण भागात पाणी साठवणूक ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. यात या अळ्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अचानक तीव्र उन्हातही शहरातील डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
अशी घ्यावी काळजी
डेंगी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घर आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांनी पाण्याच्या टाक्या, बॅरल, हौद, रांजन, ओहरहेड टँक आदी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करून घासूनपुसून कोरडे करावे. फ्रीजमागील ट्रे, कूलर, फिशटँक, एसी यामध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांची आकडेवारी
वर्ष एकूण घेतलेले नमुने डेंगीची लागण झालेले रुग्ण मृत्यू
२०२० २११३ ४०२ -
२०२१ ९०१० १४४६ -
२०२२ ४६२७ ७४२ -
२०२३ ९४७९ १६५० ४
२०२४ ७४७ ९१ -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.