Nashik News : निराधार, निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार अपटेड शिबिर

Nashik News : तालुक्यातील ९ मंडलात सोमवार (ता. ८) ते शुक्रवार (ता.१२) दरम्यान आधार अपडेट व बँक खात्याला आधार संलग्नीकरण शिबिराचे आयोजन केल्याची माहीती दिंडोरीचे तहसिलदार मुकेश कांबळे यांनी दिली.
camp schedule
camp scheduleesakal
Updated on

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील राज्य शासन पुरुस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती डायरेक्ट बेनिफिट ट्रॉन्सफर (डीबीटी) पोर्टलव्दारे भरण्यासाठी तालुक्यातील ९ मंडलात सोमवार (ता. ८) ते शुक्रवार (ता.१२) दरम्यान आधार अपडेट व बँक खात्याला आधार संलग्नीकरण शिबिराचे आयोजन केल्याची माहीती दिंडोरीचे तहसिलदार मुकेश कांबळे यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठी ‘आधार’ चा उपयोग होतो. त्यासाठी अद्ययावत केलेले ‘आधार कार्ड’ च स्वीकारले जाते. म्हणून प्रत्येकाने आधार अपडेट करणे गरजेचे असून डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना मिळणारा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग होण्यासाठी व कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये व मिळणारा लाभ जलदगतीने थेट लाभार्थ्यांना मिळावा.

यासाठी प्रशासनाकडून दिंडोरी तालुक्यातील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेतले आहे. लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड अपडेट व बँक खात्याशी सलग्न करण्यासाठी तालुक्यात किंवा महा ई सेवा केंद्र. (latest marathi news)

camp schedule
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

आधार नोंदणी केंद्रावर वांरवार हेलपाटे होवू नयेत, यासाठी तहसिलदार कांबळे यांनी दिंडोरी तालुक्यातील ९ मंडलात सुट्टीचा दिवस वगळता सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आधार अपडेशन कॅम्प आयोजित केला आहे. ज्या लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात पोर्टलवर भरणे प्रलंबित आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे अपडेट केलेल्या आधारकार्डची झेरॉक्स.

राष्ट्रीयकृत बँक खातेच्या पासबुकची झेरॉक्स व बैंक खात्याला लिंक केलेला मोबाईल क्रमांक, दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन नाशिक यांचेकडील दिव्यांग प्रमाणपत्रासह कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन तहसिलदार मुकेश कांबळे, नायब तहसिलदार बकरे यांनी केले आहे.

camp schedule
Nashik NMC : जाहिरात होर्डिंग्ज परवानगीत अनियमितता; तारांकित प्रश्नावर महापालिका प्रशासनाची कबुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.