Aapli Godavari : ‘आपली गोदावरी’ स्पर्धेस आजपासून प्रारंभ! महापालिका, नगर परिषदेतर्फे आयोजन; 15 लाख रुपयांची बक्षिसे

Latest Nashik News : यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची बक्षिसे असून, घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. ३) या स्पर्धेस प्रारंभ होत आहे.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा सुंदर व शाश्वत विकास व्हावा यासाठी नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने ‘आपली गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट डिझाइन’ स्पर्धा सुरू केली. यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची बक्षिसे असून, घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. ३) या स्पर्धेस प्रारंभ होत आहे. (Aapli Godavari competition starts today)

सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ या चर्चासत्रात बुधवारी (ता. २) महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. गोदावरीचा विकास व नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच कुंभमेळ्याच्या अनुषंगाने, ‘आपली गोदावरी’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

यात नागरिक, वास्तुविशारद, संस्था तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा विनामूल्य सहभाग अपेक्षित आहे. गोदावरीच्या काठावर असलेल्या परिसराचा सुंदर व शाश्वत विकास करून नाशिकच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला चालना देणे, तसेच पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर देत पर्यटन वृद्धिंगत करणे हा मुख्य उद्देश आहे.

धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी कशा पद्धतीने बदल घडविता येईल, याविषयी स्पर्धकांनी ऑनलाइन कल्पना मांडायच्या आहेत. त्यासाठी महापालिकेने संकेतस्थळ तयार केले आहे. पण त्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बदल सुचविला असून, त्यानुसार संकेतस्थळाचे नाव बदलण्यात येणार आहे. (latest marathi news)

Nashik NMC
Nashik Industry News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ‘उद्योगभरारी'

स्पर्धेसाठी निवडलेली महत्त्वाची ठिकाणे :

-कुशावर्त तीर्थ अहिल्या गोदा संगम-त्र्यंबकेश्वर

-चंद्राघाट परिसर त्र्यंबकेश्वर

-सोमेश्वर धबधबा नाशिक

-होळकर पूल ते टाळकुटेश्वर मंदिर परिसर, नाशिक

-तपोवन, नाशिक

-दसक-पंचक घाट परिसर, नाशिक

पारितोषिके

प्रथम : ५ लाख रुपये

द्वितीय: ३ लाख रुपये

तृतीय : २ लाख रुपये

पाच विशेष : प्रत्येकी एक लाख रुपये

Nashik NMC
Prakash Ambedkar : जनता विचारते आहे, पाच वर्ष झोपले होते का? मोदी-शहा यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही : प्रकाश आंबेडकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.