अभोणा : चणकापूर धरणात एका इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय येथील पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास केशवराव कापडणीस, (वय ३८) शिक्षक, गुरुकुल माध्यमिक विद्यालय खमताने (ता. सटाणा), राहणार हौसिंग सोसायटी, नामपूर रोड, सटाणा, यांनी रविवार (ता. १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोबाईल क्रमांक ९६०४८३६२८३ वरून पत्नी दीपाली कापडणीस यांना 'मी चणकापुर धरणावर आलो आहे व हा माझा शेवटचा कॉल आहे' असे सांगून कॉल बंद केला. (abhona teacher jump into chankapur dam questionable)