Junior College Admission : अकरावीची अखेरची यादी मंगळवारी; सुमारे 300 विद्यार्थ्यांचा फेरीत सहभाग

College Admission : इयत्ता अकरावीच्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अंतिम प्रवेश फेरीची निवड यादी मंगळवारी (ता.२४) प्रसिद्ध होणार आहे.
Junior College Admission
Junior College Admission esakal
Updated on

नाशिक : इयत्ता अकरावीच्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अंतिम प्रवेश फेरीची निवड यादी मंगळवारी (ता.२४) प्रसिद्ध होणार आहे. दरम्‍यान फेरीत सहभागासाठीच्‍या नोंदणी प्रक्रियेत शनिवारी (ता.२१) दुपारपर्यंत २८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन सहभाग नोंदविला होता. काही विद्यार्थ्यांनी कोट्याच्‍या जागांसाठी अर्ज केले आहेत. अकरावी प्रवेशाच्‍या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश होता. (About 300 students participated in final list of class 11 on Tuesday )

अकरावी प्रवेशाच्‍या पहिल्‍या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्‍यानंतर पुढील दोन नियमित फेऱ्यांना अल्‍प प्रतिसाद मिळाला होता. त्‍यामुळे तीन नियमित फेऱ्यानंतरही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्‍त राहिल्‍या होत्‍या. त्‍यामुळे शिक्षण विभागातर्फे विशेष फेरीचे आयोजन केले होते. पहिल्‍या विशेष फेरीत मोठ्या संख्येने प्रवेश झाले. यानंतर टप्‍याटप्‍याने पाच विशेष फेऱ्या आत्तापर्यंत पार पडल्या आहेत. सहाव्‍या व यावर्षीच्‍या शेवटच्‍या फेरीची सध्या प्रक्रिया सुरु आहे. या फेरीमध्ये नियमित तसेच एटीकेटी तत्‍वास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्‍ध करुन दिली होती. (latest marathi news)

Junior College Admission
Junior College Admission : अकरावीच्या 44 टक्के जागांवर प्रवेश निश्चिती

तरीदेखील १० हजारापेक्षा अधिक जागा रिक्‍त आहेत. सहाव्‍या विशेष फेरीत सहभागासाठी आवश्‍यक असलेली नोंदणीची मुदत शनिवारी (ता.२१) सायंकाळी सहापर्यंत दिलेली होती. या मुदतीत शनिवारी दुपारपर्यंत २८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहे. एक हजारापेक्षा जास्‍त विद्यार्थ्यांचे कोट्याच्‍या जागेसाठी अर्ज दाखल आहेत. पुढील दोन दिवस माहितीचे विश्‍लेषण केल्‍यानंतर मंगळवारी (ता.२४) या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवार (ता.२५) पर्यंत मुदत दिली जाईल.

Junior College Admission
Nashik Junior College Admission : अकरावीच्या पाचव्‍या विशेष फेरीत 364 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.