Nashik Monsoon Update : खरीप पिकांना जीवदान, मात्र टंचाई जैसे थे! 5 तासांतील 51 मिमी पावसाने येवलेकरांना दिलासा

Nashik News : मंगळवारी संध्याकाळी पाच ते सहा तासात झालेल्या सुमारे ५० मिलिमीटर पावसाने येवला शहर व तालुक्यातील खरीपाला जीवदान मिळाले आहे.
The mung bean crop flourished in the area during light rains.
The mung bean crop flourished in the area during light rains.esakal
Updated on

येवला : मंगळवारी संध्याकाळी पाच ते सहा तासात झालेल्या सुमारे ५० मिलिमीटर पावसाने येवला शहर व तालुक्यातील खरीपाला जीवदान मिळाले आहे. मोठ्या विश्रांतीनंतर आणि प्रथमच झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनाही हायसे वाटले असले तरी पुन्हा पावसाने उघडीप दिली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता देखील आहे. (About 50 millimeters of rain in 5 to 6 hours has benefits to Kharif crop in Yeola)

तालुक्यात सुरुवातीपासूनच संतधार तसेच रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे जूनची पर्जन्याची सरासरी ओलांडली असली तरी खरीपाच्या पेरण्या मात्र या पावसाने मार्गी लागल्या आहेत. तथापि, आतापर्यंत जोरदार पाऊस झाला नसल्याने जमिनीची पाण्याची ओलही पूर्ण झालेली नाही. शिवाय नदी-नाले, विहिरी अद्याप कोरड्याठाक आहेत.

त्यातच मागील १० ते १२ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागात खरिपाची पिके पाण्यावर आली होती. किंबहुना पिके उन देखील धरू लागली होती. जुलैच्या मागील नऊ दिवसांत तालुक्यात सरासरी १४ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.

सर्वत्र पडत असलेला पाऊस आपल्याकडेही यावा, अशी याचना करीत असतानाच मंगळवारी संध्याकाळी पाचनंतर हलक्या पावसाने हजेरी लावली. हळूहळू हा पाऊस वाढत गेला. कमी-अधिक प्रमाणात सुमारे चार ते पाच तासापर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यामुळे तालुक्यात सरासरी ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत १८९ मिलिमीटर पाऊस तालुक्यात पडला आहे. (latest marathi news)

The mung bean crop flourished in the area during light rains.
Nashik ZP News : ‘सुपर 50’ उपक्रमात 5 हजार 700 विद्यार्थ्यांची नोंदणी

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत येवला महसूल मंडळात ४७ (तहसील कार्यालयाच्या नोंदीनुसार ५१ मिमी), नगरसूलमध्ये २७, अंदरसूलमध्ये २७, पाटोद्यात १६, सावरगावमध्ये ४७, जळगाव नेऊरमध्ये १६, अंगणगावमध्ये ४२, तर राजापूर महसूल मंडळात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी रात्री या पावसाने दिलासा दिला असला तरी बुधवारी व गुरुवारी थेंबभरही पाऊस झाला नसून पुन्हा कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आजही तालुक्यातील ९० टक्के जलस्रोत कोरडेठाक आहेत. विहिरी, बोअरवेलला पाणी उतरलेले नसल्याने अजूनही ९५ च्या आसपास गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. पाणीटंचाईतून सुटका व्हावी, यासाठी शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

राजापूरला सर्वात कमी पाऊस

महारेनच्या पर्जन्यनोंदी नुसार आतापर्यंत तालुक्यातील आठ मंडळात सरासरी १२२ टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंतच्या सरासरी १५३ मिमीच्या तुलनेत सर्व महसूल मंडळाची सरासरी गाठली गेली असून, १०० टक्क्यांहुन अधिक नोंद झाली आहे. त्या तुलनेत राजापूर मंडळात मात्र फक्त १३९ मिमी (९० टक्के) पावसाची नोंद झाली असून, या भागात पिकांची अवस्था ही केविलवाणीच असल्याचे दिसते.

The mung bean crop flourished in the area during light rains.
Nashik Tourist Places : विकेण्ड पावसाळी पर्यटनावर पोलिसांकडून निर्बंध! भावली, गंगापूर धरणासह त्र्यंबक परिसरात बंदोबस्त लावणार

मंडळनिहाय पाऊस

मंडळ - सरासरी - पाऊस - टक्के

येवला - १५३ - १८४ - १२०

नगरसूल - १५३ - २२० - १४३

अंदरसूल - १५३ - १९६ - १२८

पाटोदा - १५३ - २१७ - १४१

सावरगाव - १५३ - १६५ - १०७

जळगाव नेऊर - १५३ - १६४ - १०७

अंगणगाव - १५३ - २२० - १४३

राजापूर - १५३ - १३९ - ९०

एकूण - १५३ - १८९ - १२३

The mung bean crop flourished in the area during light rains.
Nashik News : मातेच्या अंतिम दर्शनासाठी ‘ऑक्सिजन’वरील पुत्राची स्मशानभूमीत धाव! निवाणेत मातृप्रेमाचे दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.