Nashik News : लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार

Nashik News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली.
Crime
Crime esakal
Updated on

जुने नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली. भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. कैफ शेख ऊर्फ लाल्या (रा. भारतनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित तरुणी सोमवारी (ता.७) नवीन सीबीएस बसस्थानकात फिरत होती. संशयित कैफ शेख याच्याशी तिची भेट झाली. आपुलकीने दोघांनी चर्चा केली. तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. (Abuse of married with lure of marriage )

त्यानंतर त्यांची ओळख वाढत गेली. त्याने तिला तिच्याशी लग्न करत तिला सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघेही एकत्र फिरत राहिले. मंगळवारी (ता. ८) दोघेजण दिवसभर फिरल्यानंतर बिडी भालेकर मैदान येथे असलेल्या पायऱ्यांच्या आडोशात झोपण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Crime
Nashik News : जायखेड्याच्या युवकाने ताहराबाद येथे उचलले टोकाचे पाऊल

गुरुवार (ता.१०) पर्यंत अशाच प्रकारे दिवसभर फिरून रात्री बिडी भालेकर मैदान येथे जाण्याचा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. या दरम्यान वारंवार अत्याचार केले. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या सुमारास मेनरोड येथे दांडिया बघण्यासाठी गेले. संशयिताने त्याठिकाणी तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

नागरिक जमा झाल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येतच पीडित तरुणीने भद्रकाली पोलिस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. चौकशी अंती तिच्या तक्रारीवरून संशयित कैफ शेख ऊर्फ लाल्यावर गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे अधिक तपास करत आहेत. संशयित फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Crime
Nashik News : दीपक बडगुजरला अटकपूर्व जामीन मंजूर; पोलिसांना सहकार्य, पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.