Nashik Accident News : भरधाव ट्रॅक्टरने घेतला 5 वर्षांच्या रुद्रचा बळी!

Nashik News : सोमवारी सायंकाळी रुद्र पागिरे हा बालक खेळत असताना वाहनाने धडक दिल्यानंतर मंगळवारी मृत्यू झाला होता.
Protest brought by Rudra's relatives and citizens at the city police station.
Protest brought by Rudra's relatives and citizens at the city police station.esakal
Updated on

येवला : भरघाव ट्रॅक्टर चालवून येथील विठ्ठलनगरातील पाचवर्षीय रुद्र पागिरे या मुलाचा बळी घेणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त रहिवाशांनी गुरुवारी रात्री शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, शहर पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाला अटक केली असून, ट्रॅक्टरमालकाचा तपास सुरू आहे. (5 year old boy was killed by speeding tractor)

सोमवारी सायंकाळी रुद्र पागिरे हा बालक खेळत असताना वाहनाने धडक दिल्यानंतर मंगळवारी मृत्यू झाला होता. चार दिवस उलटूनही आरोपींना अटक होत नसल्याने मृत रुद्रचे पालकांसह विठ्ठलनगर परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत संतप्त होऊन पोलिसांना जाब विचारला.

शहर पोलिस ठाणे आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज असून, फुटेजमधील मुख्य आरोपीला अटक करून त्याला कठोर शिक्षा करा, ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

या वेळी पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. कारवाई होईपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. संबंधित घटनेत राजकीय दबावाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असताना कारवाई होत नसल्याचे मृत रुद्र याची आई राधिका, वडील समाधान पागिरे यांनी व्यक्त केला आहे. (latest marathi news)

Protest brought by Rudra's relatives and citizens at the city police station.
Nandurbar Accident News : बस-दुचाकी धडकेत एक ठार, 2 गंभीर; कळंबू-सारंगखेडा रस्त्यावरील दुर्घटना

पुण्यासारखे प्रकरण होऊ देऊ नये, असे संतप्तपणे सांगत योग्य दिशेने तपास करून आरोपींना कठोर शासन करावे, असे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या वेळी म्हटले. तर, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास कुटुंबासह पोलिस ठाणे आवारात आत्महत्या करू, असा इशारा मृत रुद्रच्या आई-वडिलांनी या वेळी दिला.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी संबंधित घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेतील सागर दिलीप परदेशी यांच्या मालकीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

तसेच रात्री शहरातील बदापूर रस्त्यावरील रोकडे हनुमान मंदिराजवळील अरविंद सोम्याबापू सोनवणे (वय १९) यास अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मृत रुद्रच्या कुटुंबीयांची भेट घेत पोलिसांना सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

Protest brought by Rudra's relatives and citizens at the city police station.
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.