Nashik Accident News : वाडीवऱ्हेजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक; 8 ते 10 प्रवासी जखमी

Accident News : एसटी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला.
A bus that was injured in a collision with a truck.
A bus that was injured in a collision with a truck.esakal
Updated on

इगतपुरी : नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे जवळील व्हीटीसी फाट्याजवळ सोमवार ( ता. १२ रोजी ) सकाळी एसटी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला. यात अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले असुन ही बस नाशिकहून कसाराकडे जात होती. बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला असुन या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहे. (Bus and truck collide head on near Wadivarhe 8 to 10 passengers injured )

या घटनेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय देवराम सदावर्ते वय ५१ रा. घोटी ग्रामीण रुग्णालय, बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाणे वय ४५ रा. पाथर्डी फाटा, तेजस निवृत्ती पगार वय ४२ रा. नाशिक, मोहन रामराव वाघमारे वय ४४ रा. शिवाजीनगर सातपूर, कुंदन वसंतराव पाटील वय ३१, प्रतिमा दिघे रा. नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाले आहेत.

बस ही इगतपुरी डेपोची असुन अपघाताची माहिती मिळताच जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वाडीवऱ्हे ते विल्होळी दरम्यान राज इंफ्रास्टक्चर कंपनी कडून सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे काम एका लेंथवर अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

A bus that was injured in a collision with a truck.
Nashik Accident News : ह्रदयद्रावक! पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

तर दुसऱ्या बाजुच्या एकेरी मार्गावरच दुहेरी वाहतुक सरू असुन या मार्गावर असंख्य मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोजच सात ते आठ लहान मोठे अपघात होत आहे. तर सगळ्यात जास्त अपघात दुचाकीचे होत असून राज इंफ्रा स्टॅक्चर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली गेलेली दिसत नाही.

रविवार ( ता. ११ रोजी ) ही रात्री १० वाजेच्या सुमारास दोन तास मोठी वाहतुक कोंडी झाल्याने चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गाचे काम करणाऱ्या राज इंफ्रा स्ट्रॅक्चर कंपनीकडुन सुरु असलेले रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी प्रवासी व वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.

A bus that was injured in a collision with a truck.
Nashik Accident News : पित्याचा मृतदेह घेऊन निघाले, लेकींसह जावयालाच मृत्यूने गाठले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()