Nashik Accident News: शिरवाडे वणीला बसच्या धडकेत 3 ठार; ग्रामस्थांनी रोखला मुंबई-आग्रा महामार्ग

Subhash Niphade, Mahesh Niphade, Nitin Niphade
Subhash Niphade, Mahesh Niphade, Nitin Niphadeesakal
Updated on

Nashik Accident News : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावाजवळून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी (ता.निफाड) फाट्यावर रस्त्याच्या कडेला दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगात आलेल्या एसटी महामंडळाच्या बसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी (ता.२६) रात्री ही घटना घडली. महेश चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे असे मृत तरूणांची नावे आहे. याप्रकरणी बस चालक दीपक शांताराम पाटील, (रा. धरणगाव, जि.जळगाव) यांच्यावर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Accident News 3 killed in bus collision in Shirwade Vani Villagers blocked Mumbai Agra highway nashik)

सोमवारी रात्री दहाला नितीन, मयूर व सुभाष येथे वणी शिरवाडे फाटा येथे दुचाकी (एमएच १७ बीआर ७९७२) ही रस्त्याच्या कडेला उभी करून उभे होते. यावेळी चांदवड कडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या बस क्रमांक (एमएच २० बीएल २४३१) ने तिघांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात महेश, सुभाष व नितीन यांचे डोके व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना श्री. पावले यांनी तत्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून तिघांनाही मयत म्हणून घोषित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Subhash Niphade, Mahesh Niphade, Nitin Niphade
Jalgaon Accident News : दुचाकीच्या धडकेत दांपत्य गंभीर

तीन युवकांच्या अपघाती मृत्यू झाल्यानंतर वणी शिरवाडे येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. तसेच अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी मुंबई आग्रा महामार्गावर दीड तास या आंदोलन केले.

त्यामुळे दोन्ही बाजूकडून वाहतूक ठप्प झाली होती. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत आंदोलकांची समजूत काढली.

Subhash Niphade, Mahesh Niphade, Nitin Niphade
Tripura Rath Accident: जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना; वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 10 पेक्षा अधिक जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.