Accident
Accidentsakal

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

Latest Accident News : सिग्नलवर ब्रेकवर पाय देण्याऐवजी ॲक्सिलेटरवर दाबला आणि बस त्याच वेगाने पुढील चार ते सहा दुचाक्यांना धडक देत महामंडळाच्या बसला पाठीमागून धडकली.
Published on

नाशिक : गडकरी चौकाकडून सीबीएसच्या दिशेने भरधाव वेगातील शिवशाही बसचालकाने त्र्यंबक नाका सिग्नलवर ब्रेकवर पाय देण्याऐवजी ॲक्सिलेटरवर दाबला आणि बस त्याच वेगाने पुढील चार ते सहा दुचाक्यांना धडक देत महामंडळाच्या बसला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र एक महिला गंभीररित्या जखमी आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.(Shivshahi bus hit two wheeler at signal )

गोपाळ कोळी असे अपघातग्रस्त शिवशाही बसचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २४) दुपारी तीन-सव्वा तीन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर - नाशिक ही शिवशाही बस गडकरी सिग्नलकडून सीबीएस सिग्नलकडे येत होती. त्र्यंबक नाका येथे लाल सिग्नल होता. त्यावेळी बसचालकाने ब्रेक दाबण्याऐवजी त्याचा पाय ॲक्सीलेटरवर पडला आणि बस पुन्हा वेगातच सिग्नलच्या दिशेने धावली. त्यावेळी बसच्या समोर असलेल्या चार ते पाच दुचाक्यांना बसने धडक देत काही अंतरापर्यंत फरफटत नेले. पुढे महामंडळाच्या बसलाही धडक दिली.

Accident
Nashik Accident News : वणी- पिंपळगाव रस्त्यावर कारने पाठीमाघून दुचाकीस दिलेल्या धडकेत तीघे तरुण शेतमजुर ठार

यावेळी दुचाक्या चालकांनी प्रसंगावधान राखत दुचाक्या जाग्यावर सोडून पळ काढला. यात एक मोपेडस्वार महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर अपघातानंतर बसचालकाने पोबारा केला. दोन मोपेड तर बसच्या समोरील चाकामध्ये अडकल्या होत्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. घटनेच्याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. तर वाहतूक पोलीसही सिग्नलवर नव्हते. घटनास्थळावरून कळविल्यानंतर पोलीस दाखल झाले. काही वेळाने चालकास ताब्यात घेत त्याची वैदयकीय चाचणी करण्यात आली आहे. तर, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी मुंबई नाका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येत होता.

Accident
Nashik Accident News : येवला-मनमाड महामार्गावरील अपघातात सावरगावचे दोन तरूण ठार! हुंडाईचा चक्काचूर, कारला मागून धडक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.