32 others were killed when a pick-up carrying laborers overturned at high speed
32 others were killed when a pick-up carrying laborers overturned at high speed esakal

Nashik Accident News : वणी - धोंडबे रस्त्यावर मजुरांना घेवून जाणारी पिकअप पलटी होवून एक ठार 

Latests Nashik Accident : वणी - धोंडबे रस्त्यावरील पारेगाव शिवारातील पारेगाव फाट्यानजिक मजुरांना घेवून भरधाव वेगाने जाणारी पिकअप पलटी होवूून १ जण ठार तर ३२ जण जखमी झाले आहेत.
Published on

वणी : वणी - धोंडबे रस्त्यावरील पारेगाव शिवारातील पारेगाव फाट्यानजिक मजुरांना घेवून भरधाव वेगाने जाणारी पिकअप पलटी होवूून १ जण ठार तर ३२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे. सोमवार, ता. १३ रोजी सकाळी साडेनऊ वाजता वणी येथे कांद्याच्या चाळीवर काम करणाऱ्या चांदवड तालुक्यातील दह्याणे येथूून सुमारे ३५ मजुरांना पिकअप गाडी क्रमांक एमएच १५ एच एच ३६७८ ही वणी येथे भरधाव वेगाने येत असतांना पिकअप चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या चारीत जावून पलटी झाली. ( One dead as pickup carrying labourers overturns on Vani Dhoondne road )

यात चंदभान ठमाजी हिंगले ,वय ५० रा. दहयाणे, ता. चांदवड यांचा गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. पिकमध्ये सुमारे पस्तीस मजुर होते. त्यात ३२ रुग्ण जखमी झाले असुन नऊ गंभीर रुग्णांना वणीच्या ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात तर काहींना डॉ. वसंत पवार वैद्यकिय महाविद्यालय हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दह्याने (ता.चांदवड) येथील मजुर वणी येथे काद्यांच्या चाळीवर नेहमी प्रमाणेच कामासाठी येत होते.

अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव जखमींना बाहेर काढुन वणी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या जखमी मध्ये लहान मुलांचा समावेश आहे. ही माहिती मिळताच दह्याने येथील विलास भवर यांनी तरूणांच्या मदतीने जखमींना मदत केली.

इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डाॅक्टर असोसिएश चे खाजगी डाॅक्टर डाॅ.अनिल पवार, डाॅ अनिल शेळके, डाॅ सोहम चांडोले, डाॅ.विराम ठाकरे, डाॅ प्रकाश देशमुख, डॉ. राहूल भवर, १०८ रुग्णवाहिका डॉ. योगेश मांटे यांनी रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून तीन रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठविण्यात आले.

32 others were killed when a pick-up carrying laborers overturned at high speed
Nashik Accident News : खासगी बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 प्रवासी जखमी

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डाॅ. आनंद गाडेकर हे उपस्थित होते. जखमींवर उपचार करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. येथील लाईट बंद होत्या वातानुकुलीत कक्ष असून तेही बंद पडलेले अश्या परिस्थितीत जखमींवर उपचार करतांना मोठी दमछाक झाली कोंडलेल्या या कक्षात गुदमरलेल्या सारखे होत होते. तशाच परिस्थित मोबाईलच्या टाॅर्च लाऊन उपचार करण्यात आले.

जखमीमध्ये कल्पना हिंगले वय ४०, तुषार बाळू जाधव वय , रंजना किसन गाडेकर वय ५०, भाऊसाहेब विष्णू गांगुर्डे वय ३५, सुरेखा बाळू वासदेव वय ५०, अंबिका रामू भुसारे वय १७, रोहिणी वीरक हिंगले वय 15, तेजस नाडेकर वय ४, चेतन अशोक हिंगले वय १४ विशाल विरक इंगले वय १३, कार्तिक दत्तात्रय झडे वय तेरा, राजश्री अशोक हिंगले वय ३५, संगीता गोरख हिंगले वय 35, रोहित भाऊसाहेब हिंगले वय १५, मंगला भाऊसाहेब हिंगले वय ३५, निकिता धोंडीराम हिंगले, वय १८, वैशाली अशोक हिंगले वय १५.

संगीता राजेंद्र गांगुर्डे वय ४०, सपना सुरेश हिंगले वय १७, शुभम हिंगले वय १७, अशा दशरथ वासदेव वय ४०, मनोहर चंद्रभान हिंगले वय १६, यशराज संजय जाधव वय १४, शुभम काळू सोनवणे वय १६, महेश भाऊसाहेब हिंगले वय १७, रत्ना सोमनाथ शेवरे वय ३५, सोनल रवींद्र भोये वय ३५ यांना वणी ग्रामिण रुग्णालयात तर सिमा प्रकाश पिठे, पल्लवी संपत सोनवणे, ज्ञानेश्वर संपत सोनवणे सर्व रा. दह्याणे यांना वणी येथील खाजगी रुग्णालयात तर इतर किरकोळ जखमींनी पारेगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.

अपघातग्रस्त रुग्ण वणीत रुग्णालयात दाखल केल्यानंतर परीसरातील नागरिकांनी वणी ग्रामिण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी व निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी वणी रुग्णालयात येवून पाहाणी केली. विलास भवर, गौरव भवर, सागर भवर, भाऊसाहेब नाडेकर, चेतन भवर, बबलु भवर, सतिश भवर, वणी येथील ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात, किरण गांगुर्डे, नाना जाधव, मयुर जैन, दौलत लोखंडे, राजेश परदेशी, प्रशांत चव्हाण, तुषार दुसाने तसेच रुग्णालयातील परिचारीका, वार्डबॉय आदीसंह सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली.

32 others were killed when a pick-up carrying laborers overturned at high speed
Nashik Accident News: उज्जैनहून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला झोडगेजवळ भीषण अपघात; महिलेचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.