Nashik Accident News : ट्रक दुकानात घुसून एकाचा चिरडून मृत्यू! सापुतारा घाटाच्या पायथ्याची घटना

Nashik News : नाशिक-सापुतारा-वघई या आंतरराज्य मार्गावरील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या शामगहाण गावातील एका दुकानात ट्रक घुसल्याचा एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
A truck rammed into a shop on the interstate at Saputara Shamgahan.
A truck rammed into a shop on the interstate at Saputara Shamgahan.esakal
Updated on

Nashik News : नाशिक-सापुतारा-वघई या आंतरराज्य मार्गावरील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या शामगहाण गावातील एका दुकानात ट्रक घुसल्याचा एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास घडली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून सुरतकडे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक (क्र. जीजे-०९-यु-११००) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याचा दुभाजक तोडून ट्रक दुकानात गेला.

या घटनेत एकजण ट्रकखाली चिरडून ठार झाला. तर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीपला जोरदार धडक दिली. त्यानंतर तीन दुकाने फोडली आणि मोटारसायकलसह एका व्यक्तीला ट्रकखाली चिरडले.

या दुर्घटनेत घटनेत शामगव्हाण येथील रहिवासी शांताराम जाधव यांचा मृत्यू झाला. तर दोन जणांना किरकोळ दुखापत झाल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. (latest marathi news)

A truck rammed into a shop on the interstate at Saputara Shamgahan.
Jat Accident : टायर फुटताच मोटार झाडावर आदळून दोघे ठार

मृत जाधव हे वलसाड रेल्वे पोलिस खात्यातून निवृत्त झाले होते. याच महामार्गावरून सुरतकडे पर्यटकांना घेऊन जाणारी बस सापुतारा घाटात गेल्या रविवारी अपघातग्रस्त झाली होती. यामध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला होता. घटनेचा तपास सापुतारा पोलिस करीत आहेत.

A truck rammed into a shop on the interstate at Saputara Shamgahan.
Nashik Excise Vehicle Accident Case: अपघात करून पसार मद्यतस्कर कोर्टात हजर! गुजरातमधून संशयितास अटक; 2 वाहने जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.