Nashik Accident News : नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील पुलावरून खासगी आराम बस कोसळून एकाचा मृत्यू झाला असून, ३४ प्रवासी जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी (ता. १४) पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला. महाकाली ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी आराम बस (एमएच १४, सीडब्ल्यू ९०७२) पुण्याहून नाशिककडे येत असताना गोंदे फाटा येथील उड्डाणपुलावर ही बस अचानक अनियंत्रित झाली. (Nashik Accident Private bus fell from bridge 34 passengers injured marathi News)
पुलाचे संरक्षक कठडे तोडून थेट खाली कोसळली. अपघाताची माहिती समजताच गुरेवाडी फाटा येथील महामार्ग सुरक्षा पोलिस पथक धावून आले. पाठोपाठ वावीचे सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक देवीदास लाड, हवालदार हेमंत कदम यांनी अपघातस्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकांमधून बसमधील प्रवाशांना उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले.
अपघातात कश्यप मुकेशभाई पाठक (३५, रा. अहमदाबाद, गुजरात) याचा जागीच मृत्यू झाला. बसमधून प्रवास करणारे सुमारे ३४ प्रवासी जखमी झाले. पहाटे चालकाला झोपेची गुंगी आली असावी. त्यामुळेच बस अनियंत्रित होऊन हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. बसमधील सर्व प्रवासी पुणे येथून नाशिकपर्यंत प्रवास करत होते.
तिथून काही प्रवासी गुजरात व राजस्थान या ठिकाणी बस बदलून जाणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना सिन्नरच्या यशवंत व मातोश्री या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. तहसीलदार सुरेंद्र देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे, परिवहन अधिकारी नितीन अहिरे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.
जखमी प्रवाशांची नावे अशी
अब्दुल रज्जाक, सोनाली शेजवळ, मालती शेजवळ, सुंधी सोनी, अशरिध रेड्डी, प्रकाश कौटी, प्रियंका आलेवर, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमले, मुकेश सोळंकी, शिवाजी नालेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांडेकोरी, प्रियांशू अलवार, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.