Nashik Accident News : 'एक्साईज'चे वाहन उलटून चालक ठार; मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतानाची घटना

Nashik News : मद्य तस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
Kailash Kasbe and A State Excise Department vehicle overturned in field near Harnul
Kailash Kasbe and A State Excise Department vehicle overturned in field near Harnul esakal
Updated on

चांदवड : मद्य तस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता. ७) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या घटनेत लासलगाव पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. मद्य तस्करांची मुजोरी इतकी वाढली की थेट पोलिसांनाच आपला जीव गमवावा लागला. (State Excise Department vehicle overturned driver killed on spot)

याप्रकरणी चांदवड पोलिसांनी खुनाचा दाखल केला आहे. सिल्वासा येथून गुजरातला मद्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नाशिकच्या द्वारका सर्कल येथे सापळा देखील लावण्यात आला होता. या सापळ्याची माहिती कदाचित या मद्य तस्करांना मिळाली असल्याने त्यांनी आपले वाहन निफाडच्या दिशेने पळवले.

त्या वाहनाचा पथकाने अक्षरशः सिनेस्टाईल पाठलाग केला. पाठलाग करीत असतानाच लासलगाव येथील रेल्वे गेटजवळ हे वाहन अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तेथून ही पळण्यात तस्कर यशस्वी झाले. यावेळी तेथे अगोदरच उपस्थित असलेले लासलगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनात बसून या मद्य तस्करांचा पाठलाग करत असतानाच हे चांदवडहून मनमाडमार्गे पळत होते.

त्याचवेळी हरणूल गावाजवळ या वाहनाचा अपघात झाला. चांदवड-लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैध वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या वाहनाला समांतर पाठलाग करत असतानाच या वाहनाने सीमा शुल्क विभागाच्या वाहनाला कट मारल्यानंतर शुल्क विभागाचे वाहन हरणूल गावाजवळ थेट शेतात जाऊन उलटले. (latest marathi news)

Kailash Kasbe and A State Excise Department vehicle overturned in field near Harnul
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

वाहनाने तीन ते चार पलट्या घेतल्याने या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचे चालक कैलास कसबे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, लासलगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक शशिकांत गर्जे, नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन, चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ व पथक दाखल झाले.

सुखी संसाराला दृष्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान व चालक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मृत कैलास कसबे मूळचे गिरणारे गावचे. सध्या ते गंगापूर गावात वास्तव्यास आहे. २०२१ मध्ये पत्नीचे निधन झाले. त्या दु:खातून सावरत नाही तोच काही महिन्यांपूर्वी मुलीचेही निधन झाले. लागोपाठ दोन घटना कसबे यांच्या आयुष्यात घडल्या. त्यातून बाहेर पडत नाही तोच अपघातात त्यांचे निधन झाल्याने आता कुटुंबातील एकुलता मुलगा एकटा पडला आहे. नियतीच्या या खेळामुळे अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

Kailash Kasbe and A State Excise Department vehicle overturned in field near Harnul
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com