Nashik Accident News : कारचे टायर फुटून अपघात; युवक ठार

Nashik Accident : उड्डाणपुलावरून खाली उतरताना भरधाव कारचे टायर फुटून कार रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावर धडकल्याने कारचालक युवक ठार झाला.
Accident News
Accident Newsesakal
Updated on

Nashik Accident News : मुंबईकडून नाशिककडे येताना लेखानगर येथे उड्डाणपुलावरून खाली उतरताना भरधाव कारचे टायर फुटून कार रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावर धडकल्याने कारचालक युवक ठार झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, आईचा एकुलता एक आधार असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने लेखानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (youth dead in Car tire burst at flyover bridge )

शिवम राजेश ओतारी (रा. सप्तशृंगी चौक, लेखानगर, सिडको) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवम हा मुंबई येथील कंपनीत आयटी इंजिनिअर होता. २१ तारखेला तो त्याच्या कारने मुंबईहून नाशिक येण्यासाठी निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास तो मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरून येत असताना लेखानगर उड्डाणपुलावरून खाली उतरणार होता.

Accident News
Nashik Accident News : मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाणपुलावर चार वाहनांचा सिनेस्टाईल अपघात

त्यानुसार त्याची कार खाली उतरत असतानाच कारचे टायर फुटले आणि कार अनियंत्रित होऊन त्याचे नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव कार उड्डाणपुलालगतच्या विजेच्या खांबास धडकली. या भीषण अपघातामध्ये त्याच्या डोक्याला व मणक्याला गंभीर इजा झाली. अद्वैत वझरे (रा. सप्तशृंगी चौक) याने जखमी शिवमला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून तत्काळ दुसऱ्या खासगी रुग्णालयात त्यास उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना, रविवारी (ता.२८) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिवम् हा मुंबईतील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर होता. २१ तारखेला सुटी असल्याने तो कारने नाशिककडे परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. अविवाहित असलेला शिवम हा त्याच्या आईचा एकुलता एक आधार होता. त्याचे वडील यापूर्वीच वारले आहेत. या घटनेमुळे लेखानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस नाईक कमलेश आवारे हे तपास करीत आहेत.

Accident News
Nashik Accident News : ब्रेक फेल ट्रेलरची पाच वाहनांना धडक! कसारा घाटात अपघातात 14 प्रवासी जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.