Nashik News : गाव खेड्यात देखील आलिशान घरांच्या बांधणीमुळे घराची त्याचबरोबर बाथरूममधील चकाचक फरशीमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुळगुळीत फरशी, बाथरूममध्ये आधार नसल्याने पडून जखमी होण्याचे किंवा कायमचे जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Accidents occur in smooth floor)
अशा सर्वच घरांमध्ये ज्येष्ठांसाठी बाथरूममध्ये विशेष खबरदारी घेऊन सुविधा निर्माण करण्याची गरज पुढे येत आहे. शहरासारखीच आलिशान घरे गाव-खेड्यातील शेतमळ्यात देखील बांधण्याची हौस अनेकजण पूर्ण करीत आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात. यात आता प्रत्येक घरातील स्वच्छतागृहांची बांधणी चकचकीत बघायला मिळते.
बांधकाम व्यावसायिक एकाहून अधिक सिरॅमिक फरशी, बाथरूमची डिझाइन दाखवत घर बांधकाम करणाऱ्यांना भुलवून टाकतो. घरदेखील एकाच वेळेस बांधले जाते म्हणून अधिकचे दोन पैसे खर्च करून महागाडी गुळगुळीत फरशी व आलिशान बाथरूम बनवले जाऊ लागले आहेत. मात्र, अशा गुळगुळीत फरशीवरून तसेच बाथरूममध्ये घसरून जायबंदी होण्याचे प्रमाण शहरी तसेच ग्रामीण भागातील घरांमध्ये वाढू लागले आहे.
घरातील व्यक्ती अथवा ज्येष्ठ नागरिक पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच, पन्नाशी उलटलेले ज्येष्ठ नागरिक पडून जखमी झाल्यास लाखांचा खर्च अथवा गंभीर अधूपण कायमचे वाट्याला येऊ लागले आहे. गुळगुळीत फरशीवरून पाय घसरून पडणे, बाथरूममध्ये आधार नसणे. (latest marathi news)
त्यामुळे तोल जाताना थेट भिंतीला आपटून डोक्याला इजा होऊन गंभीर धोका, बाथरूममध्ये रोलिंगची सुविधा असावी, पाय घसरणार नाही, अशा फरशा (अॅन्टी स्लिप टाइल्स) असाव्यात, भरपूर प्रकाश असावा. अनेकदा अंधूक प्रकाशामुळे वृद्ध व्यक्तींना दिसत नाही. घराच्या ओट्यावर फरशी असल्यास त्या ठिकाणी रोलिंग टाकावे.
दुखापतीचे स्वरूप
मणक्याला धक्का बसणे किंवा तोल सांभाळताना मनगटाला धक्का बसणे, खुब्यांना मार लागणे, गुडघ्याला लागणे असे जखमी जास्त संख्येने येतात.
"गुळगुळीत फरशीवरून निसटून जखमींचे प्रमाण ज्येष्ठांमध्ये ८० टक्क्यांहुन अधिक असते. अशा अपघातातून फॅक्चर होणाऱ्यांचे प्रमाण व शस्त्रक्रिया करावी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाथरूम तसेच शेतमळ्यांमधील घरांना रोलिंगचा आधार मिळाल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल." - डॉ. मनोज शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ, सटाणा
"हृदयरोगी, मेंदूविकार, मधुमेही, फिट येणाऱ्या व्यक्तींना बाथरूममध्ये पडण्याचा अधिक धोका असतो. अशा अपघातातील जखमींना शस्त्रक्रियांचा खर्च ३ लाखांपर्यत गंभीरतेनुसार येतो. त्यामुळे बाथरूममध्ये सावधगिरी बाळगून हालचाली कराव्यात." - मयूर पाटील, आरोग्य विमा सल्लागार, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.