Nashik Crime News : भाभानगर येथील एका खासगी हॉस्पिटल येथे परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शेख रउफ रोशन (रा. वडाळागाव) असे आरोपीचे नाव असून, मे २०१२ रोजी त्याने रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादी परिचारिका एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. (Accused sentenced to hard labor in nurse rape case )