Nashik News: अमृत महोत्सवापासून झेंडे व्यवसायिकांना ‘अच्छे दिन’! भारत स्वातंत्र्य झाल्यापासून प्रथमच मोठ्या प्रमाणात विक्री

Nashik News : अमृत महोत्सव व श्रीराम जन्म भूमी उत्सवात झेंडे व्यवसायाला अच्छे दिन आले आहे.
National Flag seller
National Flag selleresakal
Updated on

मालेगाव : ‘हर घर तिरंगा’ हे शब्द देशातील प्रत्येक नागरिकांच्या कानी पडले. या वाक्याची प्रचती प्रत्येकाचा घरी दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी घरावर, कार्यालय, दुकाने येथे तिरंगा झेंडा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. अमृत महोत्सव व श्रीराम जन्म भूमी उत्सवात झेंडे व्यवसायाला अच्छे दिन आले आहे. (Nashik indian flag sell Amrit Mahotsav marathi news)

देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक घरावर झेंडे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. देशभरात मोठ्या जल्लोषात प्रत्येक नागरिकांनी घरावर झेंडे लावून उत्साह साजरा केला होता. त्यामुळे अमृत महोत्सवापासून झेंड्यांना मागणी वाढली आहे.

गेल्यावर्षी पेक्षा यंदा २२ जानेवारीला श्रीराम जन्मभूमी उत्सव साजरा झाला. उत्सवाचा वेळी नागरिकांनी भगवे झेंडे लावून उत्साह साजरा केला. प्रत्येक गाव व शहरांमध्ये गल्ली, चौकाचौकांमध्ये, राममंदिर परिसर, दुकाने, दुचाकी, चारचाकी अनेक ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले.

झेंडे विक्रीतून अनेकांना रोजगार

गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, महात्मा जोतिराव फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, स्वातंत्र्य दिन, ईद-ए-मिलाद, संत सेवालाल महाराज जयंती, वीर एकलव्य जयंती, महाशिवरात्री यासह विविध जयंती व उत्सव साजरा केले जातात. जयंती काळात मोठ्या प्रमाणात झेंड्यांची विक्री होते. (Latest Marathi News)

National Flag seller
Nashik: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम अंतिम टप्प्यात! विजयी विद्यार्थ्यांसह पालकांना मिळणार CMसोबत स्नेहभोजनाची संधी

झेंड्यांना मागणी वाढल्याने गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून प्रथमच स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव व श्रीराम जन्मभूमी उत्सव काळात मोठ्या प्रमाणात झेंड्यांची विक्री झाली. झेंडे तयार करताना प्रामुख्याने टेरिकोट कापड वापरला जातो. मागील दोन वर्षापासून टेराकोट कापडाला मागणी वाढली आहे.

"यंदा श्रीराम जन्मभूमी उत्सवामुळे प्रत्येक घरावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. शिवजयंतीला झेंडा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला."- सुधीर मुसळे, संचालक, नम्रता जनरल स्टोअर्स

"ग्रामीण भागात चैत्री पौर्णिमा, दांडी पौर्णिमा, दसरा, पाडवा, होळी, महाशिवरात्री, धर्मनाथ बीज. यात्रा यासह महापुरुषांची जयंती यानिमित्त झेंडे वापरले जातात. मागील दोन वर्षात झेंड्यांना चांगली मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने स्वतः झेंडे तयार करत असल्याने ग्राहकांना चांगली सेवा देतो."- मोहन खैरनार, झेंडे विक्रेता, चांदवड.

National Flag seller
Nashik News: जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मंजुरी! तालुक्यातील 227 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.