Nashik Police : आणखी 85 टवाळखोरांवर कारवाई! कॉलेजरोड ते आडगावपर्यंत शाळा, महाविद्यालयांबाहेर पोलिस

Latest Nashik News : शुक्रवारी (ता.२०) सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कॉलेजरोड ते आडगावपर्यंत वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयांबाहेरील आणखी ८५ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली.
Senior Police Inspector Suresh Awhad and a police team while taking action against the rioters in front of the school in Sarkarwada area.
Senior Police Inspector Suresh Awhad and a police team while taking action against the rioters in front of the school in Sarkarwada area. esakal
Updated on

Nashik Police : शाळा, महाविद्यालयांच्या परिसराला अड्डा बनविणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी खाक्‍या दाखविला आहे. शुक्रवारी (ता.२०) सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कॉलेजरोड ते आडगावपर्यंत वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयांबाहेरील आणखी ८५ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. (Action against 85 more goons)

पोलिस आयुक्‍तालयातील परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांच्‍या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांबाहेर गुरुवारी (ता.१९) कारवाई केली होती. यावेळी ९२ टवाळखोरांना पोलिसांनी चोप देत ताब्‍यात घेतले होते. ही धडक कारवाई दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२०) देखील सुरु राहिली.

पंचवटी परिसरातील लोकनेते व्‍यंकटराव हिरे महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, मेट भुजबळ नॉलेज सिटी, यासह पेठ रोड व राऊ हॉटेल परिसरातील शाळांच्‍या आवारात वावरणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली.

रामतीर्थ परिसरातही वावर असलेल्‍या टवाळखोरांना पोलिसांच्‍या कारवाईचा सामना करावा लागता. याशिवाय सारडा सर्कल भागातील नॅशनल उर्दू हायस्‍कूल, कॉलेजरोडवरील एचपीटी महाविद्यालय प्रांगण तसेच शिवाजीनगर परिसरातील शाळा, महाविद्यालयांभोवती ही कारवाई केली आहे.

यांच्‍यावर उगारला बडगा

शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणारे, स्‍टंटबाजी करणारे, छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना ताब्‍यात घेऊन त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. यासाठी आडगाव, म्‍हसरुळ, पंचवटी, मुंबईनाका व गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व दामिनी पथकातील महिला अंमलदार यांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या पथकांकडून संबंधित शाळा, महाविद्यालयांच्‍या प्राचार्य, मुख्याध्यापकांची भेट घेत त्‍यांच्‍या अडीअडचणींबाबत चर्चा केली जात आहे. (latest marathi news)

Senior Police Inspector Suresh Awhad and a police team while taking action against the rioters in front of the school in Sarkarwada area.
५ हजार ९९७ निराधारांचे कागदपत्रे अपूर्ण; न जोडल्यास अनुदान बंद होणार, मदत कक्षात माहिती देण्याचे आवाहन

कारवाई सुरुच राहणार

पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही कारवाई होत आहे. आत्तापर्यंत दीडशेपेक्षा जास्‍त टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई केलेली आहे. तरीदेखील यापुढेही ही धडक कारवाई सुरु राहणार असल्‍याचे पोलिसांनी स्‍पष्ट केले आहे.

शुक्रवारच्या कारवाईचा तपशील

पोलिस ठाणे टवाळखोर संख्या

गंगापूर ३१

आडगाव २२

म्‍हसरुळ १६

पंचवटी ०९

मुंबईनाका ०७

Senior Police Inspector Suresh Awhad and a police team while taking action against the rioters in front of the school in Sarkarwada area.
Nashik : सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही बोगस प्रस्ताव पाठविल्याची शक्यता! संशयाचे ढग; थेट भूमिकेऐवजी प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.