Nashik News : वीरगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बजावली नोटीस

Nashik News : वीरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश झाल्याने सागर खैरनार या तीनवर्षीय मुलाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे झालेल्या मृत्यूची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
Notice
Notice esakal
Updated on

Nashik News : वीरगाव (ता. बागलाण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश झाल्याने सागर खैरनार या तीनवर्षीय मुलाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे झालेल्या मृत्यूची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्रावर पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता बोरसे आणि डॉ. तृप्ती शिंदे यांना नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले. (Action against medical officers of Veergaon village)

दरम्यान, या प्रकरणी आरोग्य विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून, शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे समजते. बागलाण तालुक्यातील वटार येथील रहिवासी सागर खैरनार यांचा एकुलता मुलगा स्वराज याचा २३ जूनला तिसरा वाढदिवस होता. संपूर्ण कुटुंबीयांनी आनंदाने वाढदिवस साजरा केला. रात्री सर्व कुटुंबीय झोपले असता पहाटे स्वराजला नागाने दंश केला.

वडील सागर यांनी तत्काल स्वराजला वीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र या केंद्रात दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. हजर असलेल्या आरोग्यसेविकेने स्वराजला सटाणा येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने स्वराजचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य अधिकाऱ्यांची हलगर्जी समोर आली आहे.

या प्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ चौकशी अहवाल मागवून घेतला. यात दोन्ही वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावत तत्काळ खुलासा दाखल करण्याचे निर्देश दिले. गुरुवारी (ता. २७) त्यांच्याकडून खुलासा मिळण्याची शक्यता आहे. हा खुलासा मिळाल्यावर आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (latest marathi news)

Notice
Nashik News : युएनच्या स्पेशल फोर्समध्ये सहायक आयुक्त पत्की! महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला अधिकारी

नवीन प्रणालीचा उपयोगच नाही

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बायोमॅट्रिक, सेल्फी हजेरी सुरू केली. मात्र, या नवीन प्रणालीचा उपयोग होत नसल्याचे शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र व वीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारामुळे समोर आले आहे. याबाबत आता आरोग्य विभागाने कठोर पावले उचलत कारवाई करण्याची मागणी होऊ लागली.

"वीरगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल." - डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Notice
Pune Nashik Highway : ‘राँग साइड’ तरीही सुसाट! पुणे-नाशिक महामार्गावरील स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com