Nashik News : अनधिकृत खाद्य विक्रेत्यांवर कारवाई! मनमाड स्थानकावर 16 लाखांचा दंड वसूल

Nashik News : मनमाड रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाच्या वतीने प्लॅटफॉर्म व गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर संयुक्त कारवाईची मोहीम राबविली.
Office, staff during inspection of canteen at railway station.
Office, staff during inspection of canteen at railway station.esakal
Updated on

Nashik News : मनमाड रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाच्या वतीने प्लॅटफॉर्म व गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर संयुक्त कारवाईची मोहीम राबविली. जानेवारी ते जुलै महिन्यात १३७३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करीत १६ लाख ६० हजार ४२२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (Action against unauthorized food sellers 16 lakh fine at Manmad station)

रेल्वेच्या मालमत्ता सुरक्षेसाठी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या काही वर्षात मनमाड व परिसरात रेल्वे मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरोधात सातत्याने मोहीम राबविल्याने गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

त्याचप्रमाणे कोणतेही कारण नसताना चेन पुलिंग करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर वाणिज्य विभाग व आरपीएफकडून संयुक्त कडक कारवाई करण्यात आली असून. रेल्वेचे तिकीट काढण्यात आले आहे. तसेच, दलालांवर कारवाई केली आहे.

ज्यामुळे रेल्वेच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै या महिन्यात एकूण १३७३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत १६ लाख ६० हजार ४२२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. (latest marathi news)

Office, staff during inspection of canteen at railway station.
Nashik Officers Fake Proof : मरकडने दिलेले पुरावेही बनावट! राज्यसेवा आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

कठोर कारवाईचा इशारा

रेल्वेच्या आवारात किंवा गाड्यांमध्ये अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या किंवा विनाकारण गाड्यांमध्ये साखळी ओढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ॲंटी हॉकर्स स्क्वॉडच्या सततच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांचे समर्पण दिसून आले आहे. हे परिणाम रेल्वे नेटवर्कची अखंडता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी बांधिलकी दर्शवतात.

Office, staff during inspection of canteen at railway station.
Nashik River Video: जगण्यासाठी मृत्यूशी खेळ! पूल नाही.. पोराबाळांसह पोहत पार करावी लागते नदी, व्हिडीओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.