Nashik City Transport : शहर वाहतूक शाखेकडून विना हेल्मेट, सीटबेल्ट वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई होत असताना, बेशिस्त रिक्षाचालकांकडे होणारा डोळेझाककडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्याची गंभीरपणे दखल घेत सोमवारी (ता. ८) शहर वाहतूक शाखेने फ्रंटसीट, विनागणवेश, विना परवाना रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई करीत तब्बल पावणे दोन लाखांचा दंड इ-मशिनद्वारे आकारला आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. (Nashik action from traffic department on issue of unruly rickshaw driver )
शहर वाहतूक शाखेतर्फे बुधवारपासून (ता. ३) शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विना हेल्मेट, सीटबेल्टसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात वाहतूक शाखेकडून चारही विभागामध्ये धडक कारवाई सुरू केली होती. या कारवाईचे शिस्तबद्ध वाहनचालकांकडून स्वागत होत असले तरीही बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई होत नव्हती.
त्यासंदर्भातील ‘फ्रंटसिट रिक्षाचालकांवर कारवाई कधी?’असा सवाल उपस्थित करीत ‘दै. सकाळ’मधून बातमी सोमवारी (ता. ८) प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत, शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांनी वाहतूक शाखेच्या चारही विभागात बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.(latest marathi news)
त्यानुसार, सोमवारी (ता. ९) सकाळपासून पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड या चारही विभागात फ्रंटसिट, विनागणवेश, विना परवाना रिक्षा चालविणे, क्षमतेपेक्षा जाता प्रवासी यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ३३९ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात इ-चलानद्वारे १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
विनासीटबेल्टच्या १२० केसेस
शहर वाहतूक शाखेने रविवारी (ता. ७) दिवसभर आयुक्तालय हददीतील चार विभागात कारवाईची मोहीम राबविली. यात वाहतूक शाखेने विना सिटबेल्टच्या १२० चालकांविरोधात कारवाई करीत २८ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणार्या ९ चालकांविरोधातही कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड इ-चलानद्वारे आकारण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.