Nashik Police : शहरालगतची गुदामांची झाडाझडती सुरू; शहर पोलिसांची कारवाई

Nashik Police : पुण्यात कोट्यवधींचा एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थांचा साठा सापडल्याने नाशिक पोलिसही सतर्क झाले असून, शहरालगतच्या गुदामांची कसून तपासणी सुरू केली आहे.
Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik
Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashikesakal
Updated on

Nashik Police : पुण्यात कोट्यवधींचा एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थांचा साठा सापडल्याने नाशिक पोलिसही सतर्क झाले असून, शहरालगतच्या गुदामांची कसून तपासणी सुरू केली आहे. बंद असलेल्या गुदामांचीही झाडाझडती सुरू केली आहे. गेल्या वर्षी शहरातही मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा सापडल्याने त्यानंतर संथ झालेल्या चौकशीबद्दल ‘सकाळ’मधून प्रश्न उपस्थित केल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी आता आपला मोर्चा पानटपऱ्यांकडेही वळविला आहे. (Nashik police continues to watch warehouse near city marathi news)

पुण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा सापडल्याने नाशिक शहर पोलिसही सतर्क झाले आहेत. गेल्या वर्षी नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचे दोन कारखाने सापडले होते. तर ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा थेट संबंध या कारखान्यांशी असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

तसेच नाशिक पोलिसांनीही सोलापुरात जाऊन दोन एमडी ड्रग्जचे कारखाने उद्‍ध्वस्त करीत लाखोंचा साठा जप्त करीत नाशिकमधील सनी पगारे टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यानंतर सातत्याने ड्रग्ज पेडलर्संना अटक केली आहे. मात्र पुण्यातील कारवाईमुळे नाशिक पोलिस सतर्क झाले आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांच्या विशेष शाखा आणि पोलिस ठाणेनिहाय पथकांनी शहरालगत असलेल्या गुदामांची तपासणी सुरू केली आहे. या गुदामांवर अचानक जात पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. तसेच बंद असलेल्या गुदामांचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik
Nashik Police : ‘पीपल ओरिएंटेड’ पोलिसिंगवर भर

विशेषतः शिंदेगाव परिसराप्रमाणेच खासगी औद्योगिक वसाहतींमध्ये नव्याने सुरू झालेल्या केमिकल, ॲग्रो कंपन्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या केमिकल कंपन्यांसह छोट्या-छोट्या गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांचीही पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

पानटपऱ्यांवर लक्ष

शहरातील काही पानटपऱ्यांवरही प्रतिबंधात्मक गुटखा व अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यानुसार आयुक्तांनी आपला मोर्चा शहरातील पानटपऱ्यांकडे वळविला आहे. पोलिस ठाणेनिहाय पानटपऱ्यांची माहिती संकलित करून या पानटपऱ्यांची तपासणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पानटपऱ्याचालकांचे धाबे दणाणले आहे.

''औद्योगिक वसाहती आणि शहरालगत असलेल्या गुदामांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच पानटपऱ्यांवरही कारवाई केली जाणार असून, तशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.''- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक (latest marathi news)

Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik
Nashik Police : शनिवारपासून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलिस’! पोलिस आयुक्तांची संकल्पना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()