Nashik News : हॉटेलमधून एक कोटी 98 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई

Latest Nashik News : नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये बुकिंग केलेल्या एका रूममध्ये तब्बल एक कोटी ९८ लाख रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Cash found in hotel.
Cash found in hotel.esakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये बुकिंग केलेल्या एका रूममध्ये तब्बल एक कोटी ९८ लाख रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. जयंत बाळासाहेब साठे (रा. आनंदनगर कोपरी, जि. ठाणे) यांनी दोन बॅगांमध्ये ही रोकड हॉटेलमध्ये आणली. दरम्यान, देवळाली मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्यासह माजी नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित होते, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मकसूद जिलानी यांनी केला आहे. (action of Election Commission seized 1 Crore 98 Lakhs from hotel )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.