Nashik News : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हवर कारवाई सुरू!

Nashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोबाईलवर बोलणे, सिग्नल जम्प तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Regional Transport Office officers and staff while checking 'Drunk and Drive'.
Regional Transport Office officers and staff while checking 'Drunk and Drive'.esakal
Updated on

Nashik News : वाढते अपघात आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या घटना थांबविण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोबाईलवर बोलणे, सिग्नल जम्प तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात दिवसेंदिवस वाहन अपघातांची संख्या वाढत आहे. (Action on drunk and drive from Regional Transport Office)

विशेषतः दुभाजकाला वाहन धडकणे, नियंत्रण सुटणे, यामुळे वाहन अपघात वाढले आहेत. यामध्ये दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांवर वचक ठेवून, वाहन अपघात कमी करण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने आरटीओकडून काही दिवसांपासून खासगी बस, शालेय वाहने यांची तपासणी सुरू आहे. दोषी आढळल्यास नशेबाज चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांविरोधात परिवहन विभागाकडून यापुढे कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली. ज्या वाहनाचा विमा नसेल ते वाहन जप्त केले जाणार आहे. तसेच विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही घेणार आहे. (latest marathi news)

Regional Transport Office officers and staff while checking 'Drunk and Drive'.
Nashik Assembly Election : शिवसेनेकडूनही 7 जागांवर दावा; विधानसभा निवडणुकीसाठी 7 प्रभारी

दरम्यान, अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारूच्या नशेत वाहने चालविल्याने होत असल्याचे विविध अहवालातून निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी आरटीओकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. तसेच पंचवटी, आडगाव, म्हसरूळ या ठिकाणी मोटर वाहन निरीक्षक घनशाम चव्हाण.

सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील, महेश बोंद्रे, वाहन चालक पंकज मोकाशे तसेच वायुवेग पथक क्रमांक १ यांच्यातर्फे मोबाईल ४, सिग्नल जम्प १५ तर मद्यप्राशन १३० तपासणी करून ४ जणांवर कारवाई केली. यातील बहुतांश कारवाया या दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी आहेत.

Regional Transport Office officers and staff while checking 'Drunk and Drive'.
Nashik ZP News : दिव्यांग पडताळणी न केलेले 69 कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात! जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.