Nashik News : शहरात मांसविक्री करताना परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. परंतु वारंवार सूचना देऊनही परवाना न घेणाऱ्या १५५ मांस विक्रेत्यांवर पशुसंवर्धन विभागाने कारवाई निश्चित केली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. (Nashik Action taken against 155 meat sellers in city)
महापालिका हद्दीमध्ये मांसविक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी उपविधी तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मांसविक्री व्यवसाय करताना पशुसंवर्धन विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना मिळाल्यानंतर अटी व शर्तींनुसार मांस विक्री करणे बंधनकारक आहे. त्यात मांस व मासळी विक्रीची जागा बंदिस्त व स्वच्छ ठेवावी, असे स्पष्ट केले आहे.
तरी शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर मांसविक्री होते. मांस उघड्यावर कापल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने सर्वेक्षण केले. त्यात ७४७ मांसविक्री दुकाने आढळली. त्यातील ३३६ विक्रेत्यांनी मांसविक्री परवाना काढला. (latest marathi news)
१५८ विक्रेत्यांना नवीन परवाना, तर १५० मांस विक्रेत्यांनी परवाना नूतनीकरण केले. त्या व्यतिरिक्त शहरात ४०० हून अधिक बेकायदा दुकाने असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडे आहे. या विरोधात दोन भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
त्यानुसार १५५ मांस व मासळी विक्रेत्यांवर कारवाईचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. नियमानुसार महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला कारवाई करता येत नसल्याने अन्न व औषधे प्रशासनाकडे कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.