Nashik Crime News : तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या 59 दलालांवर गुन्हा; मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाची कारवाई

Nashik News : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून विना तिकीटासह अनधिकृत हॉकर्सविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
Railway police with suspected black marketers of tickets.
Railway police with suspected black marketers of tickets.esakal
Updated on

मनमाड, ता. १२ : लोकसभा निवडणूक आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच प्रवासी रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच अनुषंगाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून विना तिकीटासह अनधिकृत हॉकर्सविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली. जानेवारीपासून आतापर्यंत रेल्वेच्या आरक्षित तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्या ५९ दलालांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Action taken against unauthorized hawkers without ticket)

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ विभागांतून जाणाऱ्या १०६ उन्हाळी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये भुसावळ विभागाच्या रेल्वे प्रबंधक इती पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीएफ आणि वाणिज्य विभागाचे संयुक्त पथक तयार करुन या गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती.

यामध्ये भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिकरोड या रेल्वे स्थानकांवर गेल्या आठवड्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ५२ आरपीएफ अधिकाऱ्यांसह ४८ वाणिज्य विभागातील टीटीईंचा समावेश होता. या अभियानात सुमारे ४८७ फुकट्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

तर रेल्वे स्थानक परिसरात धुम्रपानासह कचरा टाकणाऱ्या ६ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ९५ हजार ९९५ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफकडून भुसावळ विभागात अनधिकृत हॉकर्स व वेंडरांविरुद्ध देखील कारवाईची मोहीम राबवली जात आहे. (latest marathi news)

Railway police with suspected black marketers of tickets.
Nashik Crime News : दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात सटाणा पोलिसांना यश

यामध्ये २०२३ मध्ये १० हजार ४५५ अनधिकृत हॉकर्सविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून १ कोटी ८६ लाख १० हजार ९०५ रुपयांचा दंड आकारला. तर यंदा जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३ हजार ७०३ अनधिकृत हॉकर्सविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईतून त्यांच्याकडून सुमारे ५७ लाख १२ हजार ४२२ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

कारवाईमुळे दणका

रेल्वेच्या ई-तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर छापा टाकून रेल्वे विभागाकडून कारवाई केली जात आहे. ऑनलाईन काढल्या जाणाऱ्या आरक्षित तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे विभागाकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Railway police with suspected black marketers of tickets.
Nagpur Crime News : विक्रेत्याला खंडणीसाठी केली मारहाण; रेल्वे स्थानक परिसरातील घटना; तिघांना अटक

"उन्हाळ्यात बाहेरगावी फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश गाड्यांना गर्दी होत आहे. या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर व सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाड्या सोडण्यात आल्या असून, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा."- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ रेल्वे विभाग

"प्रवासादरम्यान प्रवाशांनी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींकडून खाण्या पिण्याच्या वस्तू खरेदी करु नये. तसेच, कोणत्याही कारणासाठी चैन पुलिंग करू नये. धावत्या गाडीत आणि स्थानक परिसरात धूम्रपान करू नये." - संदीपकुमार देसवाल, पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, मनमाड

Railway police with suspected black marketers of tickets.
Nashik Crime News : मुख्य संशयित वैभव लहामगेला ठाण्यातून अटक! कुस्तीपटू लहामगे खुन प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.