World Population Day 2024 : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात उपक्रम

Nashik News : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पंधरवड्यात जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Primary Health Centre
Primary Health Centreesakal
Updated on

Nashik News : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पंधरवड्यात जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दर वर्षी ११ जुलैला साजरा केला जातो. जगभरातील लोकसंख्येच्या समस्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. (World Population Day)

शाश्वत विकास, पुनरुत्पादक आरोग्य आणि कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा दिवस लोकसंख्या वाढ, त्याचा संसाधनांवर होणारा परिणाम आणि आरोग्यसेवा आणि शिक्षणात समान प्रवेशाची गरज यावर चर्चा करण्यास प्रोत्साहित करतो. विविध उपक्रमांद्वारे, जागतिक लोकसंख्या दिन, जबाबदार लोकसंख्या व्यवस्थापन, लिंग समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो.

शेवटी सर्वांसाठी संतुलित आणि समृद्ध भविष्यासाठी प्रयत्न करतो. लोकसंख्येचा वाढता आलेख थांबण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ‘हम दो-हमारे दो’ याप्रमाणे प्रत्येक कुटुंबात कुटुंब नियोजन संकल्पना रुजविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध मार्गाने जनजागृती करण्यात येते.

आरोग्य संस्थेत कुटुंबनियोजन स्त्री व पुरुष शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय, कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार, लग्नाच्या वेळीचे वय लांबविणे, मुलीसाठी १८ व मुलाचे वय २१ वर्षांनंतर विवाह करणे, दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यास ओरल पील्स गोळी, निरोध, तांबी, अंतरा इंजेक्शन. (latest marathi news)

Primary Health Centre
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

बाळास स्तनपान करणाऱ्या इत्यादी साधनांचा वापर करणे यांचा प्रतार व जनजागृती केली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी आशा व अंगणवाडी मार्फत लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, डॉ. दीपक लोणे यांनी दिली.

ओळख नव्या विकसित भारताची

लोकसंख्येचा स्फोट थांबू या, या वर्षीचे जागतिक लोकसंख्या दिनाचे शीर्षक. ‘माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यांत योग्य अंतर ठेवा’, ‘ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दांपत्याची’ हे घोषवाक्य निश्चित केली आहेत.

Primary Health Centre
Nashik Tree Plantation : पर्यावरण रक्षणार्थ सरसावले जलसंपदा सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.