नाशिक रोड : नाशिक शहरातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यसन, जुगारासह दुचाकी किंवा मोबाईल खरेदीच्या आमिषाने गंडविले जात आहे. यामुळे देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. (Addiction among College Student Fraud)
गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांना पैसे देऊन एमडी, रोलेटच्या आहारी लावले जाते. त्या पैशांचा परतावा न केल्यास महाविद्यालयीन युवकांच्या नावावर शोरूममधून ५ ते १० हजार रुपये डाउन पेमेंट करून एक लाख ते अडीच लाख रुपये किमतीच्या दुचाकी खरेदी केल्या जातात.
त्या दुचाकी ७० ते ८० हजार रुपयांत मालेगाव, धुळे येथील एजंटला विकतात किंवा नाशिक शहरातच ताबे गहाण दिली जातात. ही सर्व वाहने शहरात विनानंबर प्लेट चालवली जात आहेत. तसेच काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पैशांचे आमिष देऊन दुचाकी खरेदी करतात आणि पासिंग न करताच किंवा पासिंग करून परस्पर विक्री करतात.
विद्यार्थ्यांच्या नावावर महागडे आयफोन शून्य डाउन पेमेंटवर खरेदी केले जातात आणि ते मोबाईल दुकानात ३० ते ४० हजार रुपये कमी भावाने विकले जातात. सुरवातीला दोन-तीन हप्ते भरले जातात, त्यानंतर विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना हप्ते भरणे शक्य होत नाही.
यामुळे त्यांचे सिबिल रेकॉर्ड खराब होतात आणि रिकवरी एजंटच्या त्यांच्या घरी चकरा सुरू होतात. यामुळे मानसिक तणावात आलेले विद्यार्थी नशेच्या आहारी जातात किंवा गुन्हेगारीकडे वळत आहेत. काही युवक नैराश्याने आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारत असल्याचे दिसत आहे. (latest marathi news)
पालकांची संमती बंधनकारक करा
युवकांच्या नावावरची वाहने गुन्ह्यात वापरली जाण्याची शक्यता असल्याने या विषयाचे गांभीर्य ओळखून १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना दुचाकी लोनवर देताना पालकांची संमती बंधनकारक करावी. तसेच शहरात विना नंबर प्लेट फिरणाऱ्या दुचाकींवर कारवाई करावी, असे गंभीर प्रकार करणाऱ्या साखळीतील दोषींवर कडक कारवाई करावी, अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत.
राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन
दरम्यान अशाप्रकारे वाढणारी गुन्हेगारी थांबवावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नुकतेच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना दिले आहे. निवेदनात महाविद्यालयीन गरीब मुलांना कर्जबाजारी करून मृत्यूच्या खाईत ढकलले जात असल्याचेही म्हटले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रमीज पठाण, ॲड. तुषार जाधव, भावनेश राऊत, डॉ. दानिश खान, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.