Nashik Adivasi Morcha : आदिवासी शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोमवार (ता.२६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. जिल्हाभरातून आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी सीबीएस ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडवरच ठिय्या मांडल्याने रस्ता सलग दुसऱ्या दिवशी दुतर्फा वाहतुकीसाठी बंद राहिला. (Nashik Adivasi Morcha marathi news)
तर, शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे आणि पोलिस यांच्या सातत्याने खटके उडाल्याचे पहावयास मिळाले. जिल्हाभरातील आंदोलकांनी आपले कुटुंबीय व वाहनांसह रस्त्यावरच ठाण मांडल्याने मंगळवारी (ता.२७) सकाळपासूनच मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ दुतर्फा रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला.
यामुळे या मार्गावरील रहदारी पर्यायी मार्गाने वळविली आहे. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली, गंगापूर पोलिस ठाण्याची जादा कुमक, वाहतूक शाखेचे जादा अंमलदारांना ठिकठिकाणी तैनात केले. राखीव दलाच्या तुकड्या आंदोलनस्थळी सज्ज ठेवल्या. (latest marathi news)
कर्मचारी, विद्यार्थ्यांना मनस्ताप
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिटको कनिष्ठ महाविद्यालय आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलकांच्या गर्दीला सामोरे जावे लागत आहे. तसेच हुतात्मा स्मारकालगतच शासकीय कन्या विद्यालय असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींनाही मनस्ताप होत आहे.
जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, या दोन्ही कार्यालयांत कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या दबंगगिरीला सामोरे जावे लागले. पोलिसांनी बॅरेकेटींग करून रस्ते अडविले तर, कार्यालयात जाणाऱ्यांनाही ओळखपत्र पाहूनही पोलिस सोडत नसल्याने अनेकांचे खटके उडाले.
पर्यायी मार्गांवर ताण
स्मार्ट रोडवरील ठिकठिकाणी बॅरेकेटींग करून रहदारी अडविली. तर, आंदोलकांनीही त्यांची वाहने एमजी रोड, सीबीएस चौक, अशोकस्तंभ येथे आडवी लावली आहेत. स्मार्ट रोडमार्गे जाणारी रहदारी पर्यायी मार्गाने वळविल्यामुळे शरणपूर रोड, गंगापूर रोड, चोपडा लॉन्स, रामवाडी रस्ता, शालिमार चौक या परिसरातील रस्त्यांवर रहदारी वाढल्याने अतिरिक्त ताण आला. तर, स्मार्ट रोड आणि एमजी रोडवरील व्यावसायिकांना आंदोलकांचा आर्थिक फटकाही बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.