Nashik News : पानवेली काढण्यासाठी प्रशासनाची लगबग; गोदापात्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर विसर्ग

Nashik : कित्येक दिवसांच्या खंडानंतर पाटबंधारे खात्याकडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
On Tuesday, the work of removing the Panveli formed in Godapatra between Mhasoba Patangana and Khandoba Patangana with the help of JCB.
On Tuesday, the work of removing the Panveli formed in Godapatra between Mhasoba Patangana and Khandoba Patangana with the help of JCB.esakal
Updated on

Nashik News : कित्येक दिवसांच्या खंडानंतर पाटबंधारे खात्याकडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर वाहून आलेल्या पानवेली गाडगे महाराज पुलाखालील सांडव्याजवळ अडकून पडल्या आहेत. त्या काढण्यासाठी महापालिका प्रशासनाची मंगळवारी (ता.५)सकाळपासून लगबग सुरू होती. (Nashik Administration preparation rush to remove Panveli marathi news)

पाण्याअभावी गटारगंगा झालेल्या गोदापात्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर कालपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परंतु या पाण्याबरोबरच अहिल्यादेवी होळकर पुलाच्या वरील बाजूस अडकून पडलेल्या पानवेली मोठ्या प्रमाणावर वाहून आल्या आहेत. खंडेराव महाराज कुंडालगतच्या सांडव्याजवळ त्या अडकून पडल्याने हे नदीपात्र की शेती असा संभ्रम पडावा, अशी स्थिती होती. (Latest Marathi News)

On Tuesday, the work of removing the Panveli formed in Godapatra between Mhasoba Patangana and Khandoba Patangana with the help of JCB.
Nashik News : डांगसौंदाणेतील रस्ता काँक्रिटीकरणाला गती मिळेना! 2 महिन्यांपासून वाहतूक बंद

त्यामुळे सकाळपासून जेसीबी व अन्यप्रकारे या पानवेली हटविण्याचे काम सुरू होते. दिवसभरात किती पानवेली काढली याची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नसली तरी या ठिकाणाहून जवळपास पन्नासहून अधिक ट्र्रॅक्टरभर पानवेली काढण्यात आल्या.

एवढ्या पानवेली आल्या कुठून?

कालपर्यंत कोरडेठाक पडलेले नदीपात्र मंगळवारी सकाळपासूनच खळाळून वाहू लागल्यावर गाडगे महाराज पुलावरून मार्गक्रमण करत असलेल्या नाशिककरांना भल्या सकाळीच या पानवेलीचे दर्शन झाले. एवढी पानवेली कुठून वाहून आली असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तपोवन परिसरातही मोठ्या प्रमाणावर पानवेली जमा झाल्या आहेत.

On Tuesday, the work of removing the Panveli formed in Godapatra between Mhasoba Patangana and Khandoba Patangana with the help of JCB.
Nashik News : ‘सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये जऊळके विभागात प्रथम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.