लासलगाव : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाले. त्याच्या इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. (Nashik Administrative approval for Lasalgaon sub district Hospital news)
उपजिल्हा रुग्णालयात सुमारे चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर १३, असा एकूण १७ पदे वाढणार आहेत. त्यामुळे परिसरातील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात पुढील टप्प्यात सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध होऊन नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांसाठी स्वतंत्र मजला, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, लिफ्ट, पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन, सीसीटिव्ही यंत्रणा, सोलर लाईट, भूमिगत गटार, बायोमेडिकल वेस्ट, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, पार्किंग, गार्डन, फर्निचर, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था, इलेक्ट्रिकल यंत्रणा यासह विविध कामांचा समावेश असणार आहे. या कामास लवकरच सुरवात होऊन लासलगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.