Nashik News : निफाड तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट

Nashik News : पावसाळा व आगामी विधानसभा निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुकांना खो बसला आहे. त्याचा परिणाम निफाड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट आली.
gram panchayat
gram panchayat esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : पावसाळा व आगामी विधानसभा निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुकांना खो बसला आहे. त्याचा परिणाम निफाड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट आली. सरपंच,उपसरपंच व सदस्य यांची पाच वर्षाची कारकीर्द आज संपुष्टात आली. ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने गावकीचे राजकारण थंडावले आहे. (Administrative rule over 16 gram panchayats in Niphad taluka)

तसेच ही राजकीय वादळापूर्वीची शांतता मानली जाते. ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात येत असल्याने गेली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यापासून संबंधित गावोगावी सत्ताधारी व विरोधी गटाकडून मोर्चेबांधणीला सुरु होती.

विरोधक जोमात

संभाव्य उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यास संकेत मिळाल्याने त्यांनीही मोर्चेबांधणीला सुरवात केली होती. पण तूर्त निवडणुका पुढे ढकलल्याने सगळ मुसळ केरात गेले आहे. प्रशासकीय राजवटीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांच्या हातून गावची सूत्र गेल्याने विरोधी गटात आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. (latest marathi news)

gram panchayat
Nashik NMC : प्रकल्पास विलंब झाल्याने 3 कोटी 13 लाखाचे अनुदान रद्द! यापूर्वीचीही रक्कम मागितली परत

विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची चिन्ह आहेत. निवडणूक आयोगाने निफाड तालुक्यातील निवडणूकीसाठी पात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर न केल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी १६ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

निवडणूक होत नसल्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्याचा हिरमोड झाला आहे. प्रशासक राजवट लागू झालेल्या ग्रामपंचायती-मरळगोई खुर्द,पाचोरे खुर्द,तळवाडे, थेरगांव,विष्णुनगर, देवपूर,दिंडोरी तास,कुंदेवाडी,मरळगोई,पाचोरे बु.,सारोळे खुर्द,शिंपी टाकळी,तामसवाडी, वेळापूर,डोंगरगाव,पाचोरेवणी.

gram panchayat
Nashik Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची पेरणी; शरद पवार यांच्या उपस्थितीत आज निफाड येथे शेतकरी मेळावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.