Junior College Admission : अकरावीच्या 44 टक्के जागांवर प्रवेश निश्चिती

Nashik News : गेल्या दोन महिन्यांत इयत्ता अकरावीच्या तीन नियमित फेऱ्यांनंतर ४४.६४ टक्के जागांवर प्रवेश निश्चिती झाली तर, अद्यापही ६२.२२ टक्के जागा रिक्त आहेत.
Collage Admission
Collage Admissionesakal
Updated on

Nashik News : गेल्या दोन महिन्यांत इयत्ता अकरावीच्या तीन नियमित फेऱ्यांनंतर ४४.६४ टक्के जागांवर प्रवेश निश्चिती झाली तर, अद्यापही ६२.२२ टक्के जागा रिक्त आहेत. तत्पूर्वी या रिक्त जागांसाठी विशेष फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार बुधवार (ता.३१) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होती. (Admission confirmed in 44 percent of 11th seats)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शहरातील ६९ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या २८ हजार २८० जागा उपलब्ध आहेत. १० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. तर निम्म्यापेक्षा जास्त अर्थात १७ हजार ५९६ जागा अद्यापही रिक्त आहेत.

त्यात कॅपच्या १५ हजार ३३२ तर कोटाच्या २ हजार २५७ जागांचा समावेश आहे. या कालावधीत कॅपप्रमाणे कोटा अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विशेष फेरी-१ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ८ ऑगस्टला रात्री ८ वाजेपर्यंत कोट्यातील रिक्त जागा ‘कॅप’कडे प्रत्यार्पित केल्या जाणार आहेत. (latest marathi news)

Collage Admission
Nashik Tree Plantation : हरणबारी धरण परिसरात बहरणार वृक्षचळवळ! डोंगर परिसरात दीड लाख वृक्षारोपणाचा संकल्प

विशेष फेरीचे नियोजन

-१ ते ४ ऑगस्ट पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी करणे

-विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्वपरीक्षण

-५ ऑगस्टला सकाळी दहा वाजता गुणवत्ता यादी जाहीर

- विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट प्रवेशाची अंतिम मुदत

Collage Admission
Nashik Officers Fake Proof : मरकडने दिलेले पुरावेही बनावट! राज्यसेवा आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.