Nashik News : ‘टायपिंग’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Nashik News : राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक टायपिंग, लघुलेखन परीक्षा (जीसीसी टीबीसी) उत्तीर्ण झाला असाल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) असाल, तर प्रवेश शुल्क परत मिळणार आहे.
Students who pass 'typing' will get fee refund
Students who pass 'typing' will get fee refundesakal
Updated on

वणी : राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक टायपिंग, लघुलेखन परीक्षा (जीसीसी टीबीसी) उत्तीर्ण झाला असाल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) असाल, तर प्रवेश शुल्क परत मिळणार आहे. शासनाच्या अमृत संस्थेकडून अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. परिषद आणि अमृत संस्थेमध्ये तसा नुकताच करार झाला.

सारथी, बार्टी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांशीही परिषदेकडून तसा पत्रव्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य परीक्षा परिषदेतर्फे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा, ऑनलाइन लघुलेखन परीक्षा सुरू आहेत. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योजनेत सामावून घेत अर्थसहाय्य करण्याचा विचार परिषदेकडून करण्यात येत आहे.

त्यातच आता ‘ईडब्ल्यूएस’मधील विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अर्थसहाय्य योजनेतून परीक्षा शुल्क परत मिळेल. अमृत संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे.

याबाबतचा करार परिषद आणि अमृत संस्थेत नुकताच करण्यात आला. जून २०२४ च्या परीक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही मदत देण्यात येणार आहे. उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे हा या मागचा हेतू असल्याचे परिषदेने स्पष्ट केले. (latest marathi news)

Students who pass 'typing' will get fee refund
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदार आज बजावणार हक्क; जिल्ह्यात 25 हजार 302 मतदारांसाठी 29 मतदान केंद्र

अशी असेल प्रक्रिया

यात उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा हजार ५०० व पाच हजार ३०० रुपयांची रक्कम प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाईल. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया केली जाईल. ज्यांना रिफंड हवा आहे, अशा विद्यार्थ्यांना नोंदणी, उत्तीर्णतेची माहिती, बँक खाते आदी माहिती द्यावी लागेल.

यानंतर लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. जून २०२४ मधील संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अमृत संस्थेच्या संकेतस्थळ www.mahaamrut.org.in, महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे संकेतस्थळ www.mscepune.in वरून अर्ज करू शकतात. लवकरच परिषदेमार्फत संस्थाचालकांसाठी प्रोग्राम तयार करून देण्यात येईल, असे परिषदेने स्पष्ट केले.

Students who pass 'typing' will get fee refund
Nashik Onion News : कांद्यावरील निर्यात उठवावी, कांद्याला हमी भाव द्यावा; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल यांची मागणी

"‘अमृत’बरोबर झालेल्या करारानुसार ‘ईडब्ल्यूएस’मधील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळेल. यासह परिषदेकडून ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘टीआरटीआय’ यांच्याकडेही पत्रव्यवहार करण्यात आला, पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्याकडून जशी पुढील प्रक्रिया होईल, त्यानुसार संबंधित संस्थेंतर्गत विद्यार्थ्यांनाही योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येईल." - डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

"राज्यात अशी योजना प्रथमच राबविली जात आहे. आर्थिकदृष्ट्या अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करताना अडथळे येतात. या उपक्रमामुळे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल. इतर सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांनाही मदतीसाठी प्रयत्न व्हावेत. संस्थाचालकांचीही जबाबदारी आहे की विद्यार्थी व पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे." - सुरेश देवरे, परीक्षा सचिव, महाराष्ट्र राज्य टंकलेखन-लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना, मुंबई

Students who pass 'typing' will get fee refund
Nashik Monsoon News : दमदार पावसाने शेतमजुरांच्या हाताला काम; कसमादे पट्ट्यातील शेतीकामांना वेग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.