Nashik News : अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्यात असून, राज्यस्तरावरील रिक्त जागांच्या स्थितीचे चित्र तिसऱ्या फेरीनंतर स्पष्ट होणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये ४० टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तिसऱ्या फेरीत एक लाख ४४ हजार २३८ विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्ध केली. त्यांना प्रवेश निश्चितीसाठी सोमवार (ता. ९)पर्यंत मुदत असेल. त्यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर संस्थास्तर फेरी राबविली जाईल. (Admission to 40 percent of engineering seats)