Nashik News: नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राअभावी प्रवेश रखडणार; ग्रामीण भागात सर्व्हर डाउनमुळे विद्यार्थी पालकांची वणवण

Nashik : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विधी क्षेत्रात प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत.
certificate
certificateesakal
Updated on

Nashik News : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विधी क्षेत्रात प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. तथापि नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे उन्नत प्रवर्गात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याचे हे प्रमाणपत्र वेळेत महाविद्यालयात सादर करण्यासाठी अडचणी येणार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र शैक्षणिक प्रवेशासाठी व सवलतीसाठी सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे. (Admission will be stopped due to non creamy layer certificate )

राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड सेतू कार्यालयात उडाली आहे. तथापि नेटवर्कच्या समस्येमुळे व वारंवार सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारीमुळे विद्याथ्यांना दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वेळेवर दाखले न मिळाल्यास शाळा व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया रखडण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना म्हणून पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्जाची पोच पावती व हमीपत्र भरून घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशीही मागणी आहे. (latest marathi news)

certificate
Nashik News : नोकरी संदर्भात बनावटी नियुक्ती पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल; सावध राहण्याचे महानिर्मितीचे आवाहन

अर्जाचा खच

ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्र आणि आपले सेवा केंद्रात दाखल्यांचा प्रस्तावांचा खच पडला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीसाठी दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कोतवाल यांनी केली आहे.

''सर्व्हर डाउनमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. उन्नत प्रवर्गात (नॉन क्रिमिलेयर) प्रमाणपत्र वेळेत महाविद्यालयात सादर करण्यासाठी अडचणी येणार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र शैक्षणिक प्रवेशासाठी व सवलतीसाठी सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी.''- नामदेव कोतवाल ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

certificate
Nashik Traffic News : पावसाने खोळंबली वाहतूक! मुंबई नाका, द्वारका, आडगाव नाका परिसरात कोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.