Nashik News : बहुजन समाजाने अपप्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी नाशिकमध्ये विभागीय कार्यकर्ता संवाद अभियानाच्या समारोपप्रसंगी केले. या वेळी राज्य उपाध्यक्ष ना. म. साठे, सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, साहेबराव शृंगार, अनिल बाविस्कर, रवींद्र पाटील, राजाभाऊ थोरात, कल्पना खरात, अंबादास अहिरे, बापूसाहेब गायकवाड, संजय भिसे, मंदाताई ठोकळ, नाना जाधव, अरुण खरात, संतोष साळवे, विलास सूर्यवंशी, भगवान अस्वले, अमोल गोरे, दादा अस्वले, रोहित लांडे, इम्रान शेख आदी उपस्थित होते. (Adv dhoble Bahujans should fight together against abuse)
ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या, अण्णाभाऊ साठे स्मारक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. ज्या गतीने अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण केले गेले त्याच गतीने महाराष्ट्रातील महापुरुषांची स्मारके झाली पाहिजे. मातंग समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला बळ मिळाले पाहिजे.कलावंतांना मुख्य प्रवाहात घेतले गेले पाहिजे. आयएएस अधिकारी पूजा खेडकर सारख्या बोगस प्रमाणपत्र बनवून शासकीय योजनांच्या व सवलतीचा दिवसेंदिवस लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. (latest marathi news)
दिव्यांगांच्या बाबतीतही असेच होत आहे. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कोणीही लाभ मिळत असून खरा लाभार्थी मात्र वंचित राहतो. शासनाने राज्यस्तरीय समिती नेमून जिल्हानिहाय अशा प्रमाणपत्रांची चौकशी केली पाहिजे. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१९ ला शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता.
कोरोनेामुळे शासनाला एकही उपक्रम राबविता आला नाही मग ते शंभर कोटी गेले कुठे याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे. बाराबलुतेदार हे भारतीय समाज आणि कृषी व्यवस्थेचा कणा आहे. तो कणा आज मोडून पडला आहे. यास मुख्य कारण ते संघटित नाही. त्यांचे नेतृत्व करणारे खंबीर नेतृत्व उरलेले नाही त्यांचा वापर फक्त मतदानपुरता होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.