Nashik News : विनाअनुदानित तत्त्वावरील शाळा, शिक्षक, सेवकांचे प्रश्न मार्गी लावणार : ॲड. गुळवे

Nashik News : नाशिक विभागातील अनुदानापासून वंचित असलेल्यांना न्याय देण्याबाबत तातडीने पावले उचलत शासन दरबारी ते मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांनी केले.
On the occasion of Nashik campaign, Adv. Sandip Gulve.
On the occasion of Nashik campaign, Adv. Sandip Gulve.esakal
Updated on

Nashik News : अनेक वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर काम करीत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानित तत्त्वावर आणण्यासाठी प्राधान्याने काम करणार असून, नाशिक विभागातील अनुदानापासून वंचित असलेल्यांना न्याय देण्याबाबत तातडीने पावले उचलत शासन दरबारी ते मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांनी केले. (Adv Gulve statement Unaided school teachers servant issue will be solved)

नाशिक येथे विविध शिक्षक मतदारांच्या भेटी घेत त्यांनी आगामी काळात प्रलंबित असलेल्या मागण्या तडीस नेण्यासाठी दिलेल्या शब्दाला जागणार असल्याचे सांगत बुधवारी (ता. १९) नाशिक विभागात गेल्या अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. त्यांच्या अनुदानाबाबत सरकारकडे ज्या पद्धतीची मांडणी करून प्रस्ताव मांडायचा असतो.

त्याचा रोडमॅप आपल्याकडे तयार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, कलात्मक विकासासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या कला व क्रीडाशिक्षकांची भरती व शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करून शिक्षकांना आरोग्य विमाही त्वरित लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, राज्य शासकीय व खासगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती जशास तशा लागू करणेकामी सर्वतोपरी प्रयत्न करून सेवकांना सेवा सुरक्षिततेची हमी देणार असल्याचे गुळवे यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भवन उभारणार

ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना आपल्या हक्काचे ठिकाण असल्यास जिल्ह्यातील सर्वच संस्थांमधील शिक्षक एकच छताखाली येऊन ज्ञानाची देवाणघेवाण करतील व त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी होणार आहे. त्यासाठी त्यांना हक्काची वास्तू असणे गरजेचे असल्याने प्रत्येक जिल्ह्यात भव्य शिक्षक भवन उभारून त्यात आधुनिक सुविधा दिली जाईल, असेही गुळवे म्हणाले. (latest marathi news)

On the occasion of Nashik campaign, Adv. Sandip Gulve.
Nashik News : अंधश्रध्देविरोधात पंचवटीत प्रबोधन मोहीम; भोंदूगिरी शून्यावर पोलिस - अंनिसचा उपक्रम

"आज बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर हे घटक परमोच्च स्थानी आहेत. ज्ञानदानाचे पावित्र्य जपणाऱ्या या गुरुजनांच्याही विविध मागण्या असतात. इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यांना आजपावेतो न्याय देण्याचे काम झालेले नाही. यामुळेच आम्ही एकत्र येऊन ॲड. संदीप गुळवे यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याबाबत त्यांना सखोल ज्ञान असून, स्वतः उच्चशिक्षित असल्याने प्रत्येक प्रश्नावर त्यांच्याकडे योग्य मार्ग आहे. म्हणून त्यांना टीडीएफसह बहुतांश शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करतो, की आपण ॲड. संदीप गुळवे यांना मोठ्या फरकाने निवडून द्यावे." - बाळासाहेब सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक नेते, ‘टीडीएफ’. माजी सेवक संचालक, ‘मविप्र’ संस्था.

On the occasion of Nashik campaign, Adv. Sandip Gulve.
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेला शासनाकडून ‘आर्थिक टेकू’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com