Sant Nivruttinath Maharaj : आध्यात्मिक लोकशाहीचे पुरस्कर्ते : संत निवृत्तिनाथ

Nashik News : मध्ययुगीन काळात अनेक पंथांचा गजबजाट पाहायला मिळत होता. महानुभाव पंथ, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि याबरोबरच नाथपंथाची विचारधारा आपले वेगळी अस्तित्व निर्माण करीत होती.
Sant Nivruttinath
Sant Nivruttinathesakal

Nashik News : संत निवृत्तिनाथांची वारी या आजच्या भागात निवृत्तिनाथांचे कार्य समकालीन संतांना कसे प्रेरक ठरले, याविषयी माहिती घेणार आहोत. मध्ययुगीन काळात अनेक पंथांचा गजबजाट पाहायला मिळत होता. महानुभाव पंथ, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि याबरोबरच नाथपंथाची विचारधारा आपले वेगळी अस्तित्व निर्माण करीत होती. या सर्व पंथ-उपपंथांच्या गजबजाटात सर्वसामान्य माणूस मात्र दिशाहीन होत होता. (Sant Nivruttinath Maharaj)

समकालीन धर्मव्यवस्था ही केवळ धर्माचे नीतीनियम नियंत्रित करीत नव्हती; तर माणसांच्या सामाजिक जीवन व्यवहारांमध्ये धर्माचे मोठे प्राबल्य मध्ययुगीन काळात आपल्याला दिसते. महानुभाव पंथाची विचारधारा आणि आचारधर्म हाही एकीकडे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करीत होता. मात्र, महानुभाव पंथात असणाऱ्या सांकेतिक लिप्या आणि या पंथाची असणारी वेशभूषा अर्थात काळे कपडे यामुळे नंतरच्या काळात महानुभाव पंथाकडे वळणारा अनुयायी हा रोडावत गेला.

मात्र, साहित्यदृष्ट्या महानुभव पंथाचे योगदान निश्चितच मोठे आहे. वारकरी पंथाच्या अगोदर सुमारे दहा वर्षे मराठीत ग्रंथरचना करणारे माहीम भट व नागदेवाचार्यांसारखे साहित्यकार महानुभाव पंथांनी दिले, ही महानुभाव पंथाची मोठी उपलब्धी होय. मात्र, वारकरी संप्रदायाच्या समकालीन असणारे हे उपपंथ समाजमनावर दीर्घकाळ पकड धरू शकले नाहीत.

याच दरम्यान संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, परिसा भागवत आदी संतांनी नव्या विकसित अशा आध्यात्मिक समता सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली आणि ज्ञानेश्वरांसारखा प्रतिभावंत योगी निवृत्तिनाथांच्या प्रेरणेने वारकरी संप्रदायाचे मोठे संघटन करू शकला. एकनाथांनी निवृत्तिनाथांना विश्वगुरू म्हणून संबोधले. त्याच्या पाठीमागे असणारी निवृत्तिनाथांची सर्वच संतांना मिळणारी प्रेरणा होय. (latest marathi news)

Sant Nivruttinath
Nashik Teacher Constituency Election : दराडे- ॲड. गुळवे- कोल्हे यांच्यात रंगणार तिरंगी सामना

निवृत्तिनाथांची गुरू परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे. नाथ संप्रदाय हा आदिनाथ भगवान शंकरापासून आलेली आपली परंपरा सांगतो; तर थेट गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथांपर्यंत आणि निवृत्तिनाथांपर्यंत ही परंपरा येऊन पोहोचते. नाथ संप्रदायात असणारा हटयोग पुढील काळात मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने तो केवळ योग्यांचा विषय आणि साधनेचा विषय झाला.

नाथपंथ सनातन असा भागवत धर्म याचा समन्वय साधून निवृत्तिनाथांनी सकल समकालीन संतांना एकत्र करून एक वारकरी भक्ती आंदोलनाची निर्मिती केली. निवृत्तिनाथ आणि संत नामदेव हे या चळवळीच्या अग्रभागी होते. केवळ यज्ञसंस्थेतूनच स्वतःचा विकास साधता येतो, हा विचार मागे पडून कृष्णभक्तीतून आणि विठ्ठलभक्तीच्या नामस्मरणातून आपण आपला जीवनाचा उद्धार करू शकतो, हा बीजमंत्र निवृत्तिनाथांनी आणि समकालीन संतांनी समाजाला दिला.

आणि हीच भक्ती चळवळ वारकरी संप्रदायाची ऊर्जा ठरली. संतांचा भागवत धर्म हा जो शब्दप्रयोग आपण करतो, त्या मागे सनातन धर्म नसून, आध्यात्मिक लोकशाही आणि स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, पददलित, दुबळे या सर्व जाती जमातीतील अठरापगड लोकांना समतेच्या एका प्रवाहात सम्मिलित करणे हा नव्या भागवत धर्माचा हेतू होता आणि तेच संतांच्या कार्याचे प्रयोजन होते. मात्र, निवृत्तिनाथ या सर्व भक्ती चळवळीचे नेतृत्व पुढे होऊन करीत होते.

Sant Nivruttinath
Nashik Monsoon News : मनमाडला दुसऱ्या दिवशीही मुसळधार; पानेवाडी-आव्हाड वस्ती रस्ता गेला वाहून

आणि नामदेव सर्व संतांना निवृत्तिनाथांचे विश्वगुरू म्हणून असणारे महत्त्व समजावून सांगत होते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी किंवा आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. आता नामदेवांना जे वर्म सापडले आहे, ते वर्म हाच संतांचा भागवत धर्म होय. या सापडलेल्या वर्मात यज्ञसंस्थेने निर्माण केलेल्या कोणत्याही विचारांचे पोषण होत नव्हते, तर या विचारांमध्ये सर्वसामान्यांच्या जगण्याचे अनेक प्रश्न प्रतिबिंबित होते.

आणि त्यांना त्यातून उत्तरे मिळत होती. केवळ ‘बाबा वाक्य प्रमाण’ हा विचार मागे पडून संतांच्या हाकेला जनमानसाची मिळणारी साद ही परिवर्तनाची नांदी मधल्या काळात जनमानसांना संघटित करीत होती आणि हीच भागवत धर्माची मोठी उपलब्धी होती. थोडक्यात, नाथपंथ, भागवत पंथ याचा सुयोग्य समन्वय साधून निवृत्तिनाथांचा वारकरी पंथ हा आजच्याही काळात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतो.

Sant Nivruttinath
Nashik News : नांदूर-मानूर परिसरातील गाळ मिश्रित पाणी; शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com