Onion Import: दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात! पंजाबमध्ये 11 मालट्रकद्वारे दाखल; महाराष्ट्रात संतापाची लाट

Latest Onion News : कांद्याने भरलेले ४५ ते ५० ट्रक बॉर्डरवर उभे असल्याने दोन-तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार असल्याने आता महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Onion import From afghanistan
Onion import From afghanistanesakal
Updated on

लासलगाव : केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याकरिता परवानगी देण्यात आली. त्यामुळे अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर, जालिंदर या शहरांत अकरा मालट्रकमधून कांदा दाखल झाला. कांद्याने भरलेले ४५ ते ५० ट्रक बॉर्डरवर उभे असल्याने दोन-तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार असल्याने आता महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Afghanistan onion import to keep prices under control)

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यातील कांदा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता, भुवनेश्वर या देशातील मेगा मेट्रोसिटीमध्ये ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे केंद्रे सुरू करीत विक्री सुरू करण्यात आली.

मात्र, कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्याने आता केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली. त्यामुळे अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर, जालिंदर या शहरांत अकरा मालट्रकमधून ३०० टनहून अधिक कांदा दाखल झाला आहे. आणखी मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होण्यासाठी भारतीय सीमारेषेवर ४५ ते ५० ट्रक उभे आहेत. (latest marathi news)

Onion import From afghanistan
Amit Shah News : केंद्रीय मंत्री अमित शहा फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग! उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक

"दोन रुपये मिळतील, या उद्देशाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेला कांदा हा चाळीत साठविला. सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा सडत आहे. यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च २५ ते ३० रुपयांपर्यंत गेला. आज रोजी कुठेतरी पाच ते दहा रुपये किलोला शेतकऱ्यांना नफा मिळत असताना परदेशातून कांदा आयात करणे हे अयोग्य असून, याचे परिणाम लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कांदा उत्पादक शेतकरी दाखविल्याशिवाय राहणार नाहीत."

- निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष, शेतकरी बचत गट व कांदा उत्पादक

"अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेतरी आता चांगला दर मिळत असताना अद्यापही केंद्र सरकार कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क घेत असतानाही अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्यास परवानगी दिली. यामुळे पंजाबमध्ये कांदा दाखल होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. केंद्र सरकारने कांद्याची आयात थांबवावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. आमची त्यांच्याकडे वरील मागणी आहे. अन्यथा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना निषेध करीत तीव्र आंदोलन करेल."- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

"काही दिवसांपूर्वी ‘नाफेड’च्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला कांदा बाजारात दाखल झाला. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न होता. २४ सप्टेंबरला केंद्र सरकारने आपला कांदा असतानाही अफगाणिस्तानमधून दोन ट्रक कांदा पंजाबमधील जालंदर येथे आयात केला आहे. आपला कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. चांगला बाजारभाव मिळेल व शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे अधिकचे पडतील."

- प्रवीण कदम, कांदा निर्यातदार, लासलगाव

Onion import From afghanistan
Share Market Today: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.