Nashik News : शेवाळे नगरच्या ग्रामस्थांना 64 वर्षानंतर लालपरीचे दर्शन! विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधान

Nashik News : एरवी घोडेगावपासून पायपीट करणाऱ्या प्रवाशांना लालपरीने सुखद धक्का दिल्याने अख्या वाड्या-वस्त्यांवर समाधान व्यक्त केले जात आहे.
Students and parents welcoming the bus on behalf of the State Transport Corporation
Students and parents welcoming the bus on behalf of the State Transport Corporation esakal
Updated on

निमगाव : मालेगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील जवळपास ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शेवाळेनगर, जनार्दन स्वामी नगर भागात तब्बल ६४ वर्षांनंतर लालपरीचे दर्शन झाले. बस उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी आनंदीत झाले. एरवी घोडेगावपासून पायपीट करणाऱ्या प्रवाशांना लालपरीने सुखद धक्का दिल्याने अख्या वाड्या-वस्त्यांवर समाधान व्यक्त केले जात आहे. (After 64 years villagers of Shewale Nagar got msrtc bus)

शेवाळे नगर, जनार्दन स्वामी नगर आदी वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी निमगाव येथे टीकेआरएच विद्यालयात येतात. विद्यार्थ्यांना चार किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडेगावपर्यंत पायी अथवा सायकलने जावे लागायचे. तेथून ते विद्यालयात जायचे.

विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्राचार्य डी. एस. सावंत व शिक्षक आर. बी. सोनवणे यांनी आगारप्रमुख मनीषा देवरे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या शेवाळेनगर, जनार्दन स्वामी नगर या गावापर्यंत बससेवा सुरू करण्याची विनंती केली. बस सुरु करण्याबाबत ग्रामस्थ देखील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. अखेर विद्यालय व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले.

गावात बस येताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. विद्यार्थिनींनी बसचे औक्षण केले. ग्रामस्थ व विद्यार्थी मित्रांनी बस चालक, वाहक व बससेवेसाठी पाठपुरावा करणारे शिक्षक श्री. सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी योगेश जगताप, संजय पाटील, प्रदीप जगताप, सुनील शिंदे, जनार्दन खैरनार, योगेश सूर्यवंशी, अशोक शेवाळे, बळीराम हिरे, आत्माराम हिरे, सुरेश जगताप, गोपीनाथ जगताप, सुधाकर हिरे आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. (latest marathi news)

Students and parents welcoming the bus on behalf of the State Transport Corporation
Nashik Agricultural Success: खामखेड्यात उत्पादनखर्च शून्य, उत्पन्न मात्र चाळीस हजारांचे! कोथिंबिरीच्या दुबार पिकाचे कौतुक

या मार्गावर सोमवारपासून (ता. २२) बस दिवसाला तीन फेऱ्या पूर्ण करते. यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची सोय झाली आहे. शेवाळे नगर व परिसरातील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षणासाठी ये-जा करतात. या बसमुळे निमगावकडे जाणेही परिसरातील प्रवाशांना सुरळीत झाले आहे.

"विद्यालयाच्या पाठपुराव्याची मालेगाव बस आगार प्रमुखांनी दखल घेतली. बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना कमी वेळेत शाळेत पोहोचता येईल. तसेच, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. वेळेवर बस आल्याने मुलांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल."- डी. एस. सावंत, प्राचार्य

"शेवाळे नगर, जनार्दन नगर या रस्त्यावर आज पहिल्यांदा लालपरी धावली. पालकांनी वेळोवेळी आगार प्रमुखांशी चर्चा घडवून आणली. त्यात विद्यालयाने हातभर लावल्याने बस सुरु झाली. या मार्गाने बस धावल्याने वृद्ध प्रवाशांनाही सोयीचे झाले आहे."- योगेश जगताप, निमगाव

Students and parents welcoming the bus on behalf of the State Transport Corporation
Nashik Rice Farming : दिंडोरीत भात लावणी अंतिम टप्प्यात! पूर्व पट्ट्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.