दिंडोरी : तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे चार लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. पोळ्याच्या अगोदर मागील आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. भूजलपातळीत वाढ झाली. सहा धरणांच्या या तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये वाढ झाली. सुरवातीला वाघाड धरण भरले.
त्या पाठोपाठ पुणेगाव, पालखेड धरणातून विसर्ग करण्यात आला. कधीही लवकर न भरणारे तिसगाव धरण यावर्षी भरले. याच बरोबर तालुक्यातील सर्वच छोटी-मोठी धरणे, तळे, बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणी साठले. यामुळे सुरवातीला दुरावलेल्या खरिपासह रब्बीच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. (Satisfactory water stocking in dams in Dindori)